International water expert Dr. Rajendra Singh. while auspiciously starting the Aviral Godavari program by adding water to Tulsi plant.  esakal
नाशिक

Aviral Godavari: काँक्रिटीकरण काढण्यासाठी प्रतिष्ठेची लढाई नको; डॉ. राजेंद्रसिंह यांचे नाशिककरांना आवाहन

ब्रह्मगिरी पर्वताचा परिसर ‘इको सेन्सेटिव्ह झोन' व्हायला हवा

सकाळ वृत्तसेवा

Aviral Godavari : गोदावरीतील कुंडाचे स्वास्थ राखण्यासाठी प्राथमिकता द्यायला हवी. काँक्रिटीकरणामुळे गोदावरीच्या प्रवाहात अडथळा येतो. त्यामुळे काँक्रिटीकरण काढावे लागेल. त्यासाठी मात्र प्रतिष्ठेची लढाई करून चालणार नाही.

गोदावरीच्या प्रकृतीच्या सुरक्षेचा विचार करावा, अशी आग्रही सूचना आज येथे आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी केली. (Aviral Godavari program No prestige battle to concretize Dr Rajendra Singh appeal to Nashikkars nashik news)

नमामि गोदा फाऊंडेशन, द सत्संग फाऊंडेशन, ‘सकाळ' सोशल फाऊंडेशन, तरुण भारत संघ यांच्यातर्फे ‘मविप्र'च्या रावसाहेब थोरात सभागृहात झालेल्या ‘ब्रह्मगिरी की हरियाली, गोदावरी की पवित्रता'अंतर्गतच्या ‘अविरल गोदावरी' कार्यक्रमात डॉ. सिंह बोलत होते.

‘देशदूत'च्या कार्यकारी संपादक वैशाली बालाजीवाले यांनी डॉ. सिंह यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांना स्पर्श करीत गोदावरी नदीचा प्रवाह अविरल करण्याच्या उपक्रमात नाशिककरांनी योगदान देत विविध कामांचे मालक व्हावे, असेही डॉ. सिंह यांनी अधोरेखित केले. त्याचप्रमाणे पुरातन कुंडाचे पुनरुज्जीवन तीर्थासारखे व्हावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कुंडांचे महत्त्व आणि काँक्रिटीकरण यासंबंधीच्या प्रश्‍नाला उत्तर देताना डॉ. सिंह यांनी ही सूचना केली. पूर्वजांनी बांधलेल्या आडांची देखभाल कशी व्हावी या प्रश्‍नाला उत्तर देताना डॉ. सिंह म्हणाले, की पुरातन जलसंरचना आपण समजून घ्यायला हवी.

आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन त्यामागे आहे, म्हणूनच पूर्वीची जलसंरचना सुरक्षित ठेवणे हे पुढील पिढीसाठी प्रेरणादायी असेल. त्यासाठी कुंड, आड, विहिरींचे संरक्षण करावे लागेल. पूर्वीच्या जलसंरचना तीर्थासारख्या आहेत.

त्यामुळे अशी क्षेत्रे तीर्थासारखे होती, पर्यटनस्थळ नव्हते हे पक्के ध्यानात ठेवावे. आताचे सरकार तीर्थटनाकडून पर्यटनाकडे निघाले आहे. मात्र आपल्या आईकडून पर्यटनाच्या नावाखाली कमाई करणे उचित नाही.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

गोदा जन्मस्थळाचे व्हावे संरक्षण

ब्रह्मगिरी हिरवाकंच होणे का महत्त्वाचे आहे, या प्रश्‍नाला उत्तर देताना डॉ. सिंह म्हणाले, की गोदावरीच्या ब्रह्मगिरी पर्वतावरील जन्मस्थळाचे काळजीपूर्वक संरक्षण करावे लागेल. आता आपण आर्थिक आणि पायाभूत सुविधांमध्ये नेतृत्व करू पाहत आहोत.

मात्र ब्रह्मगिरी पर्वताचा परिसर ‘इको सेन्सेटिव्ह झोन' व्हायला हवा. त्यादृष्टीने संरक्षित क्षेत्राची अधिसूचना जारी झाली आहे. ब्रह्मगिरी पर्वत हिरवागार होण्यातून गोदावरीची पवित्रता वाढेल. पुनर्भरण, आर्द्रता वाढण्यासह भूस्तरातील आर्द्रता टिकून राहील. पाऊस होईल.

अर्थात, गोदावरी प्रवाहित होण्यासाठीचे सर्वगुण संवेदनशील ब्रह्मगिरीमध्ये आहेत. याशिवाय गोदावरीच्या आठ उपनद्यांचे पुनर्जीवन करावे लागेल. गोदावरीचा प्रवाह वाढण्यातून प्रदूषण कमी होईल. शिवाय नदी आणि गटार स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल.

‘मविप्र'च्या आर्किटेक्ट कॉलेजचे विद्यार्थी आणि अध्यापकांनी नंदिनी नदीसंबंधी तयार केलेला अहवाल डॉ. सिंह यांना सादर करण्यात आला. डॉ. सिंह यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन झाले. श्रीमती खुराना यांनी या पुस्तकांची माहिती दिली.

अभिनेते किरण भालेराव यांनी सूत्रसंचालन केले. गोदावरीच्या प्रतिज्ञामध्ये भूमिका साकारलेल्या स्वराचा डॉ. पुलकुंडवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. परमानंद अकादमीच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.

डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले...

- राजा आणि प्रजा लोभी झाल्यावर संतांनी प्रजेला नदीत घाण टाकण्यास प्रतिबंधित करावे. मात्र संत नदीला प्रदूषित करत असल्यास महाविद्यालय आणि विद्यापीठांमधील विद्वानांनी नदीला ठीक करण्याची जबाबदारी स्विकारावी

- वेदांमधील विद्या ही शुभ रस्त्याने नेते. ही विद्या सर्वांसाठी असते आणि ती मिळवावी लागत नाही, तर ती मिळते. मात्र स्वतःच्या फायद्याच्या रस्त्याने नेणारे शिक्षण मिळवण्यासाठी परिश्रम करावे लागतात

- शिक्षणामुळे आपण आर्थिक स्पर्धेत धावू लागतो. पर्यावरणीय रस्ता शुभ, सर्वांसाठी असून तो विद्यामधून आपणाला गवसतो. मात्र नदीची हत्या शिक्षण घेतलेले अज्ञानी लोक करतात

- तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी गंगा मातेसाठी २ हजार कोटींच्या प्रकल्पांना पूर्णविराम देत महिन्यात तीन बांध रद्द केले. इको सेन्सेटिव्ह झोन घोषित केला. परिणामी, भागिरथी नदी पूर्वीसारखी वाहत आहे

- नद्या ‘सुपर पॉवर' आहेत. त्यामुळे सरकार पुनरुज्जीवनासाठी चिंतेत आहे. महाराष्ट्र सरकारने ‘चला जाणूया नदीला' हा उपक्रम राबवत देशापुढे आदर्श निर्माण केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shocking News : वडिलांनी शेत विकून घर बांधायला ठेवले १४ लाख, १३ वर्षांच्या मुलाने ऑनलाईन गेममध्ये गमावले अन्... धक्कादायक घटनेने सगळेच हादरले

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

हिंदूंची जमीन मुस्लिमांच्या नावे केल्याचे आरोप, महिला अधिकाऱ्याच्या निवासस्थानी छापे; ९० लाखांची रोकड अन् कोट्यवधींचं सोनं जप्त

Latest Marathi News Updates : ऑक्टोबरपासून रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल!

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

SCROLL FOR NEXT