sagar khairnar.jpg
sagar khairnar.jpg 
नाशिक

video : 'नका देऊ कोरोनाला आमंत्रण' म्हणत...कळवणच्या 'त्या' भूमिपूत्राची थेट दिल्लीतून कोरोना जनजागृती! एकदा बघाच

भाग्यश्री गुरव : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : रोज कोरोनाचा वाढत चाललेला विळखा बघता खरचं भीती निर्माण होतेय. मी जरी नोकरीसाठी दिल्ली येथे स्थायिक असलो तरीही माझ्या जिल्ह्याला कोरोना घट्ट मिठी मारतो याची कल्पना सुद्धा सहन होत नाही. वारंवार सांगून, समजवून देखील नागरिक ऐकत नाही याचं वाईट वाटतंय...अशी खंत नाशिकमधील कळवण तालुक्यातील बेज गावचा भूमिपूत्र याने व्यक्त केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'बेज'च्या या जवानाने थेट दिल्लीतून जनजागृती केली आहे. कसे ते तुम्हीच बघा.

गाण्यामधून नागरिकांना घरात सुरक्षित राहण्याचे आवाहन

विविध माध्यमातून स्वच्छतेचे आणि स्वतःला कोरोनापासून कसं वाचवता येईल याबाबत मार्गदर्शन आणि जनजागृती केली जात आहे. अशात भारतात कोरोनाविषयक जनजागृती निर्मीती करण्यासाठी अनेक हौशी कलाकारांकडून गाणी तयार केली जात आहेत. अशातच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल येथील सहाय्यक निरक्षक पदावर कार्यरत असलेले सागर खैरनार यांनी 'कुछ ऐसा कर कमाल, की तू भी बच जाए' व 'बहोत आये गये व्हायरस खतम इक दिन ये भी होगा' या गाण्यामधून नागरिकांना घरात सुरक्षित राहण्याचे आवाहन करत आहेत. सागर खैरनार हे नाशिक मधील कळवण तालुक्यातील बेज गावचे भूमिपूत्र आहेत. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सागर खैरनार हे दिल्ली येथे इंदिरा गांधी एअरपोर्ट येथे कार्यरत आहेत. 

कोरोना फायटर्सचे मानले आभार

आठ तासाची ड्युटी संपल्यावर कामाच्या व्यापातून वेळ काढत सागर गायनाची आवड असल्याने छंद जोपासत आहेत. आत्ता पर्यंत सागर यांनी दहा ते बारा  देशभक्तीपर व प्रेरणादायी गाणे गायली आहेत. सागर यांनी आपल्या गाण्यातून आरोग्य सेतू अँप, डॉक्टर, पोलिस, पत्रकार, स्वच्छता कर्मचारी यांचे आभार मानले आहे. तसेच नागरिकांना घरात बसण्याचे आवाहन केले आहे. ज्या प्रकारे सैनिक, पोलीस, डॉक्टर देशासाठी कोरोना सोबत लढत आहेत. यासाठी नागरिकांनी देखील त्यांच्यात लढ्याला साथ म्हणून घरातच सुरक्षित राहावे असे यांनी सांगितले. 

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी मी दोन गाणे तयार केले आहेत. नागरिकांनी सरकारच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे. घरातच सुरक्षित राहावे. डॉक्टर, पोलीस यांचा आदर करावा. आम्ही तुमच्यासाठी लढतोय तुम्ही आमच्यासाठी घरातच थांबा. - सागर खैरनार, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल दिल्ली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Crash: निवडणुकीतील अनिश्चिततेमुळे निर्देशांकांची दीड टक्का घसरगुंडी; सेन्सेक्स १०६२ अंश घसरला

Blog : दाभोलकरांनंतर... युएन ते युगांडाकडून दखल, दोन कायदे अन् शाखांचा विस्तार

PBKS vs RCB Live Score : पंजाब किंग्जचंही चोख प्रत्युत्तर; रूसोची आक्रमक खेळी

Air India Express च्या केबिन क्रूचा संप संपला, 25 कर्मचाऱ्यांची बडतर्फी मागे घेणार

Virat Kohli PBKS vs RCB : पंजाब विराटवर फारच मेहरबान! पाच षटकात सोडले तीन कॅच; पाहा Video

SCROLL FOR NEXT