Madhavdas Rathi participating in Kirtan with Baba Maharaj Satarkar.
Madhavdas Rathi participating in Kirtan with Baba Maharaj Satarkar.  esakal
नाशिक

Baba Maharaj Satarkar : बाबामहाराज वारकरी संप्रदायाचे थोर कीर्तनकार हरपले; जिल्ह्यातील वारकऱ्यांच्या भावना

सकाळ वृत्तसेवा

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांनी महाराष्ट्रातील सामान्यांपर्यंत वारकरी संप्रदाय पोहोचविण्याचे काम केले. भक्तिभावात तल्लीन होऊन बाबामहाराज सातारकर कीर्तन करायचे. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायाचे थोर कीर्तनकार, अध्वर्यू हरपले असल्याची भावना नाशिक जिल्ह्यातील वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांनी व्यक्त केली.

ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे गुरुवारी (ता. २६) निधन झाले. नाशिक जिल्ह्यातील वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांनी त्यांना शब्दसुमनांजली अर्पण करून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. (Baba Maharaj Satarkar Kirtankar of Varkari offered Shabd Sumananjali nashik news)

शनैश्वर उत्सवात ९० च्या दशकात संस्कृती वैभव संस्थेतर्फे पिंपळपारावर सलग सात वर्षे घेण्यात आलेले बाबामहाराज सातारकर यांचे कीर्तन नाशिककरांच्या आजही स्मरणात आहे.

श्रद्धांजली

बाबामहाराज सातारकर यांनी वारकरी संप्रदायाचा विस्तार केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रभावी प्रसार केला. ऐश्वर्याची वचनाक्षी, ईश्वरवती ज्ञानेश्वरी हे ग्रंथ लिहिले. सुशिक्षित समाजात त्यांनी वारकरी संप्रदायाचे बीजारोपण केले. सोप्या, सुलभ भाषेत त्यांनी कीर्तनाला गायनाची झालर दिली. - रामकृष्ण लहवितकर

भक्तिभावात तल्लीन होऊन बाबामहाराज सातारकर कीर्तन करायचे. समाजातील थोर कीर्तनकार आपल्यातून हरपले आहेत. - मुरलीधर पाटील

वारकरी संप्रदायात बाबामहाराज सातारकर यांचे भाषेवर प्रभुत्व होते. कुशल वाणी व हजरजबाबी गायकीतून त्यांनी कीर्तन केले. नामनिष्ठ, प्रेमनिष्ठेतून त्यांनी संप्रदाय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविला. - माधवदास राठी

बाबामहाराज सातारकर वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू होते. त्यांच्या लोकप्रिय कीर्तनातून एक पिढी घडली, त्याचे श्रेय बाबामहाराज सातारकर यांना जाते. - भगीरथ काळे

नाशिकमध्ये पिंपळपारावर संस्कृती वैभव संस्थेतर्फे सलग सात वर्षे मेमध्ये बाबामहाराज सातारकर यांचे दोनदिवसीय कीर्तन होत असे. त्यांच्या ओजस्वी वाणीतून ते नाशिककरांना मंत्रमुग्ध करीत. - डॉ. कैलास कमोद

वारकरी संप्रदायासाठी दिलेले मूल्य असे योगदान म्हणजे हरिपाठ व अमृतानुभव ग्रंथांवरील बाबामहाराज सातारकर यांची गोड अशी प्रवचने, तसेच त्यांच्या स्वर्गीय आवाजात हरिपाठ व श्री पांडुरंगाचे काकडा भजन ऐकून अनेकांचे पाठांतर झाले. अशा या थोर माहात्म्याला आज महाराष्ट्र मुकला आहे. वारकरी संप्रदायातील पोकळी कधीही न भरणारी आहे. - नवनाथ गांगुर्डे, विश्वस्त संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थान, त्र्यंबकेश्वर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Election : बाबाजी‘ फॅक्टरमुळे नाशिकमध्ये ‘काटे की टक्कर', शेवटच्या दोन दिवसात आले महत्व

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात एल एम सरदार हायस्कूल येथील ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ

Mobile Hacks: 'या' सोप्या ट्रिक्स वापरा, मोबाईलमधील फोटो डिलिट करण्याची येणार नाही वेळ

Lok Sabha Election: विरोधकांनीही मुस्लिम उमेदवारांना ठेवले दूर! 2019 च्या तुलनेत 2024 ची स्थिती काय?

RCB vs CSK: धोनीच्या षटकारामुळे रिंकूची आठवण... CSK विरूद्ध शेवटच्या ओव्हरला काय होत्या भावना, यश दयालच्या वडिलांकडून खुलासा

SCROLL FOR NEXT