नाशिक

साकेगाव येथे ''पक्षी सप्ताहाची'' उत्साहात सांगता

CD
NSK26H34902 भुसावळ : निसर्ग मित्र, जळगावतर्फे भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे पक्षी सप्ताहानिमित्त ग्रामस्थांना पक्ष्यांबाबत माहिती देताना पक्षीमित्र शिल्पा गाडगीळ. ---- साकेगाव येथे ''पक्षी सप्ताहाची'' उत्साहात सांगता उपशीर्षक ''पक्षी शेतकऱ्यांचे खरे मित्र..’ पोस्टर प्रदर्शनास ग्रामस्थांचा प्रतिसाद जळगाव, ता. १२ : निसर्ग मित्र, जळगावतर्फे गुरुवारी (ता.१२) साकेगाव (ता.भुसावळ) येथे ‘पक्षी सप्ताहाची’ सांगता पार पडली. यानिमित्त ‘पक्षी हेच शेतकऱ्यांचे खरे मित्र!’ या महत्त्वपूर्ण संदेशावर आधारित एका विशेष पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. शेती आणि पर्यावरण यांच्यातील अनन्यसाधारण संबंध तसेच पिकांचे रक्षण करण्यात पक्ष्यांची महत्त्वाची भूमिका या कार्यक्रमात उपस्थितांना पटवून देण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पक्षीमित्र शिल्पा गाडगीळ यांनी पक्षी सप्ताह साजरा करण्यामागील उद्देश, त्याचे महत्त्व तसेच प्रख्यात पक्षीशास्त्रज्ञ डॉ. सलीम अली आणि मारुती चितमपल्ली यांच्या कार्याचा परिचय करून दिला. त्यानंतर, प्रदर्शनाविषयीची सविस्तर माहिती राजेंद्र गाडगीळ यांनी मांडली. गाडगीळ दांपत्याने आकर्षक पोस्टर्स आणि छायाचित्रांच्या माध्यमातून शेतीशी घट्ट नाळ असणाऱ्या पक्ष्यांचे महत्त्व प्रभावीपणे मांडले. पिकांवर उपजीविका करणाऱ्या उपद्रवी अळ्या, किडे आणि उंदरांचा फडशा पाडून पक्षी कशा प्रकारे पिकांचे रक्षण करतात आणि ते खऱ्या अर्थाने शेतीचे पहारेकरी कसे आहेत, याबाबतची माहिती त्यांनी विविध उदाहरणे व आकडेवारीसह ग्रामस्थांना दिली. या प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी ‘निसर्ग मित्र’चे कार्यकर्ते सुरेश महांगडे, शिल्पा गाडगीळ, ज्येष्ठ शेतकरी सुनील सूर्यवंशी तसेच ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांचे आभार पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी मानले. ---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेला स्व. अजित पवार यांचं नाव मिळणार? आदिती तटकरेंनी स्पष्ट केली भूमिका

Neha Bora: नेहा बोरा म्हणतात 'मी स्त्री नाही अन् पुरुषही नाही'! नॉन-बायनरी म्हणजे नक्की काय?

Shashi Tharoor: भारत समिटमध्ये 115 परदेशी वक्त्यांना प्रवेश नाकारला; शशी थरूर यांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : कापसाच्या दरात घसरण, शेतकऱ्यांसमोर नवे संकट; बाजारात पाचशे ते साडे पाचशे कमी दराने कापसाची विक्री

IND vs NZ 4th ODI: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये Unplayable Deliveries असं काही नसतं, फलंदाजानं...; ८९ ऑल आऊटनंतर गौतम गंभीरकडून कानउघडणी

SCROLL FOR NEXT