नाशिक

भगवान बिरसा मुंडांच्या संघर्षामुळे आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण

CD
(टुडे पान एक मेन लिड) --- फोटो : NSK26H35075/ NSK26H35076 नंदुरबार : तळोदा प्रकल्प कार्यालयाच्या डिजिटल इन्फॉर्मेशन वनसंपदा पोर्टलचे अनावरण करताना पालकमंत्री हसन मुश्रीफ. शेजारी आमश्या पाडवी, डॉ. मिताली सेठी, नमन गोयल, लघिमा तिवारी, अश्विनी सानप, धनंजय गोगटे, आशा संघवी, चंद्रकांत पाटील, पंकज पटले, डॉ. हीना गावित, डॉ. सुप्रिया गावित, डॉ. अभिजित मोरे, प्रतिभा शिंदे. दुसऱ्या छायाचित्रात महिलांना विविध योजना लाभाचे वाटप करताना पालकमंत्री. --- बिरसा मुंडांच्या संघर्षामुळे आदिवासी हक्कांचे संरक्षण पालकमंत्री हसन मुश्रीफ : जनजाती गौरव सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. १५ : भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी केलेला संघर्ष आणि दिलेले बलिदान आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आयोजित जनजाती गौरव दिन सोहळा रविवारी (ता. १५) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पार पडला. त्या वेळी पालकमंत्री बोलत होते. या वेळी आमदार आमश्या पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी लघिमा तिवारी, पोलिस अधीक्षक अश्विनी सानप, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी, प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पाटील, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी पंकज पटले, माजी खासदार डॉ. हीना गावित, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित, सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे, अभिजित मोरे आदी उपस्थित होते. या वेळी उपस्थित मान्यवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संबोधनास ऑनलाइन उपस्थिती दिली. अन्यायाविरुद्ध ‘उलगुलान’ उठाव पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, की ब्रिटिश राजवटीत आदिवासींच्या जमिनी हिरावून घेतल्या जात होत्या. सावकार आणि जमीनदारांकडून आर्थिक शोषण होत होते. या अन्यायाविरुद्ध धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांनी ‘उलगुलान’ उठाव केला. आदिवासींचे जल, जंगल आणि जमिनीवरील पारंपरिक अधिकार सुरक्षितेसाठी ब्रिटिश राजवटीला आव्हान दिले. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी भारत सरकारने १५ नोव्हेंबर हा दिवस जनजाती गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. डॉ. हीना गावित म्हणाल्या, की आदिवासी समाजाचा गौरव करण्यासाठी जनजाती गौरव दिन महत्त्वपूर्ण आहे. वनहक्क पट्टेधारकांना सातबारा उतारा देण्याचा शासनाचा निर्णय आदिवासी बांधवांसाठी दिलासादायक आहे. लघिमा तिवारी यांनी प्रास्ताविक केले. लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वाटप पालकमंत्री मुश्रीफ यांच्याहस्ते डिजिटल इन्फॉर्मेशन वनसंपदा पोर्टलचे अनावरण करण्यात आले. या वेळी अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना शेती साहित्य अर्थसहाय्य, व्यवसायासाठी अर्थसहाय्य, ठिंबक सिंचन अर्थसहाय्य, राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजनेंतर्गत कर्ज सहाय्य, शिलाई मशिन, महिला बचत गटांना प्रतिगट दहा हजार अर्थसहाय्य, वैदू प्रमाणपत्र वाट, सात ई /१२ ई प्रमाणपत्र वाटप, वनपट्टे वाटप, महिला शेतकरी प्रमाणपत्र वाटप, शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील नऊ मुख्याध्यापक व तीन शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. ६५ कोटींच्या इमारतींचे लोकार्पण धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त गडचिरोली येथे आयोजित जनजातीय गौरव दिन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तळोदा आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत उभारलेल्या ६५ कोटी रुपये खर्चाच्या सात शासकीय इमारतींचे ऑनलाइन लोकार्पण करण्यात आले. यात इच्छागव्हाण येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळा, मुलांचे-मुलींचे वसतिगृह, बोरद येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळा, शालेय इमारत, दहेल (ता. अक्कलकुवा) येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळा, रोषमाळ येथील एकलव्य मॉडेल निवासी शाळा, शालेय इमारत आणि मुलांचे वसतिगृह बांधकाम इमारत यांचा समावेश होता. प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Jail Reform : महिला कैद्यांसाठी ऐतिहासिक निर्णय! आता तुरुंगात नव्हे तर मुलाबाळांसह स्वतंत्र वसाहतीत राहता येणार; 'या' दोन शहरांची निवड!

WPL 2027: ब्रेबॉर्न नाही, आता वानखेडेवर रंगणार फायनलसहित ११ सामने! BCCI चा मोठा निर्णय; पाहा खरं कारण काय?

Latest Marathi News Live Update : मी पुढच्या वेळी राज ठाकरे यांना छठ पूजेचं आमंत्रण देणार - कृपाशंकर सिंह

Indian Ocean Geopolitics: हिंदी महासागराचा प्रवास – शांतिकडून संघर्षाकडे

‘नानांना पाठ दाबण्याचे दोन रुपये द्यायचो’; अशोक सराफांनी सांगितला भन्नाट किस्सा! म्हणाले...'भर कार्यक्रमात नानांनी पाठ दाबली'

SCROLL FOR NEXT