BJP Devendra Fadnavis strong criticism on shivsena over hindutva  sakal
नाशिक

भगवा सुरक्षिततेची जबाबदारी भाजपची ; देवेंद्र फडणवीस

फडणवीसांनी फुंकले महापालिका निवडणुकीचे रणशिंग; दत्तक शब्द पाळला, आता निर्मल नाशिकची घोषणा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिकेवर भगवा फडकेल; पण तो भाजपचा. कारण आता भगवा सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी फक्त भाजपची आहे. काही लोक फक्त भगवा मिरवत विरोधकांसोबत जात असल्याची टीका शिवसेनेवर करताना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दलालांच्या हातात महापालिका जाऊ न देता सकारात्मक परिवर्तन घडविणाऱ्या भाजपच्या हाती पुन्हा सत्ता देण्याचे आवाहन केले. दत्तक विधानाचा दिलेला शब्द पाळल्याचा दावा करताना आता पुढील पाच वर्षांत प्रदूषणविरहित निर्मल नाशिकची घोषणा त्यांनी केली.

गोविंदनगर येथील मनोहर गार्डन येथे भाजप कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी बोलताना श्री. फडणवीस यांनी महापालिका प्रचाराचे रणशिंग फुंकले. ते म्हणाले, मागील निवडणुकीत नाशिक दत्तक घेण्याचे आश्‍वासन दिले होते. नाशिककरांनी सत्ता रूपाने आशीर्वाद दिला. परंतु दत्तक नाशिकचा अर्थ काहींनी वेगळा काढला. रोज महापालिका चालवायची, असा अर्थ विरोधकांनी घेतला. मात्र जेथे महापालिकेला विकासाच्या बाबतीत अडचण असेल तेथे भक्कमपणे मागे राहू, असा अर्थ आम्ही घेतला.

पक्षातील घराणेशाहीवर बोट

विकासकामांमुळे वातावरण भाजपसोबत आहे. एका जागेवर चार ते पाच इच्छुक आहेत. विरोधकांना उमेदवार शोधावा लागत आहे. एवढी वाईट परिस्थिती आहे. जागा मर्यादित असल्याने पक्ष जो उमेदवार देईल त्याच्या मागे उभे राहावे लागेल. नेत्यांनी कार्यकर्त्यांचा व कार्यकर्त्यांनी पक्षाचा विचार करावा. नेत्यांनी नातेवाइकांचा विचार करू नये, असा सल्ला देताना पक्षातील वाढत्या घराणेशाहीवर फडणवीस यांनी बोट ठेवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT