नाशिक

पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी सदैव कार्यकर्त्यांच्या पाठीशी

CD
NSK26H35102 नंदुरबार : दिवाळी स्नेहमेळाव्यास उपस्थित आमदार राजेश पाडवी. शेजारी विजय चौधरी, नीलेश माळी. --- भाजपतर्फे दिवाळी स्नेहमेळावा उत्साहात पक्षवाढीसाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावे ः आमदार पाडवी सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. १५ : पक्षवाढीसाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत. विजय चौधरी यांची पक्षाविषयीची तळमळ मोठी आहे. पक्ष आणखी मोठा कसा होईल, यासाठी त्यांची धडपड असते. प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुख-दुःखाची, वैयक्तिक अडचणींची, तसेच पक्षकार्याची ते विचारपूस करीत असतात. ही त्यांच्या नेतृत्वाची आणि कार्याची पावती आहे, असे प्रतिपादन आमदार राजेश पाडवी यांनी केले. भाजपचे माजी प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनी विजयपर्व येथे आयोजित केलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या दिवाळी स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याला आमदार राजेश पाडवी, भाजपचे जिल्हाध्यक्ष नीलेश माळी, भाजप महिला जिल्हाध्यक्ष डॉ. समिधा नटावदकर, प्रा. मकरंद पाटील, शहादा उपनगराध्यक्षा माधवी पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी विजय चौधरी म्हणाले, की भाजपच्या संघटनात्मक बळकटीसाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे. कार्यकर्त्यांच्या सुख- दुःखात आणि संकट काळात पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी सदैव पाठीशी खंबीरपणे उभा राहीन. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देशाचा व राज्याचा कारभार सुरळीत सुरू आहे. जनहिताला प्राधान्य देत सरकार विविध विकासकामे राबवीत आहे. शासनाच्या माध्यमातून होत असलेली विकासकामे आणि लोककल्याणकारी योजनांची माहिती भाजप कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले. भाजपचे जिल्हाध्यक्ष नीलेश माळी म्हणाले, की विजय चौधरी हे कुशल संघटक असून, पक्ष आणि कार्यकर्त्यांच्या हिताला नेहमीच प्राधान्य देतात. आजचा कार्यक्रम स्नेहमेळाव्याचा असला, तरी त्याला पक्षीय संघटनात्मक जोड देण्यात आली आहे. आगामी काळातील पक्षाचे कार्यक्रम आणि संघटनात्मक नियोजन कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश आहे, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वंदे भारत ट्रेनचे ब्रेक फेल, तरी ४६३ किमी धावली; रेल्वेच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड, नेमकं काय घडलं?

''आता सेल्फी पोस्ट केली की...''; PM मोदींच्या 'त्या' विधानावरून CJP ची उपरोधिक टीका, नेमकं काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update : अमित शाह यांची मुरलीधर मोहोळ यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

Tiruchendur Soorasamharam 2026 : समुद्रकिनाऱ्यावर लाखोंचा जनसागर, ४,१०० पोलिसांचा कडेकोट पहारा! दक्षिण भारतातील 'या' प्रसिद्ध मंदिरात रंगला ऐतिहासिक सोहळा

Solar Stock To Buy : ६ महिन्यांत ३३% परतावा! आता थेट ₹५०० पर्यंत झेप घेणार 'हा' सोलार शेअर; ब्रोकरेज फर्मचा मोठा सल्ला

SCROLL FOR NEXT