Devendra Fadnavis sakal
नाशिक

नाशिक : भाजप आज फुंकणार बिगुल; फडणवीसांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा

भारतीय जनता पक्षातर्फे नाशिक महापालिकेच्या निवडणुकीचा बिगुल फुंकला जाईल

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोमवारी (ता. २२) भारतीय जनता पक्षातर्फे नाशिक महापालिकेच्या निवडणुकीचा बिगुल फुंकला जाईल. श्री. फडणवीस यांचे दुपारी दीडला शहरात आगमन होत असून, कार्यकर्ता मेळाव्यासह सायंकाळपर्यंत त्यांच्या हस्ते विविध कामांची उद्‌घाटने होतील.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसची महाविकास आघाडी सत्तेत असली, तरीही महापालिकेच्या आगामी निवडणुकीत पालकमंत्री छगन भुजबळ कितीही सांगत असले, तरीही महाविकास आघाडी एकत्र लढेल काय, याबद्दलचा तिढा अद्याप सुटलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिकेच्या जोडीला जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीची पूर्वतयारी एकीकडे सुरू केली असताना, शिवसेना आणि काँग्रेसतर्फे स्वतंत्रपणे तयारी केली जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सातत्याने स्वबळावर लढण्याबद्दल सांगत आहेत. ही बाब श्री. भुजबळ यांच्या निदर्शनातून सुटलेली नाही. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून राष्ट्रवादीसह काँग्रेस आणि शिवसेनेचे गणित कसे जुळणार, हाही प्रश्‍न कायम आहे. नेमक्या अशा राजकीय परिस्थितीच्या जोडीला राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ११ मार्चपासून मुंबईत होत असल्याने श्री. फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्याला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे.

मनोहर गार्डनमध्ये कार्यकर्ता मेळावा

श्री. फडणवीस यांचे औरंगाबादहून विमानाने ओझर विमानतळावर दुपारी एकला आगमन होईल. दुपारी सव्वादोनला ते गोविंदनगरमधील मनोहर गार्डनमध्ये पोचतील. तेथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होईल. दुपारी चारला श्री. फडणवीस पाथर्डी फाटा येथे पोचतील. तेथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होईल. सायंकाळी साडेपाचला सातपूरमधील शिवाजीनगरमध्ये वसंतराव कानेटकर उद्यान आणि सावरकर रुग्णालयाचे लोकार्पण होणार आहे. सायंकाळी साडेसहाला श्री. फडणवीस मोटारीने ओझर विमानतळाकडे निघतील. सायंकाळी सातला विमानाने ते नागपूरकडे प्रयाण करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT