The seized gas cylinders of Hindustan Petroleum Company and the second photograph shows the seized rickshaw and four-wheeler. esakal
नाशिक

Nashik Crime: मनमाडला घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार! 7 लाखाचा मुद्देमाल जप्त

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : घरगुती वापराच्या सिलिंडरमधून बेकायदेशीररीत्या प्रवासी रिक्षात गॅस भरताना जिल्हा पोलिस अधीक्षकांचे विशेष पथक आणि मनमाड पोलिसांच्या संयुक्त पथकाने कीर्तीनगर भागात छापा टाकून कारवाई केली.

छाप्यात गॅस भरण्यासाठी वापरली जाणारी इलेक्ट्रॉनिक्स मोटार, पंप, वजनकाटा व हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे ४९ गॅस सिलिंडर आणि चारचाकी, रिक्षा असा ७ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

संशयित फरार असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. (Black market of domestic gas cylinders in Manmad 7 lakh worth of goods seized Nashik Crime)

कीर्तीनगर भागात एका ठिकाणी घरगुती वापराच्या सिलिंडरमधून रिक्षामध्ये बेकायदेशीरपणे गॅस भरून काळाबाजार केला जात असल्याची माहिती मिळाली असता जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथक आणि मनमाड पोलिसांच्या संयुक्त पथकाने कारवाई केली.

छाप्यात तीन पंप, दोन वजन काटे, ४४ भरले टाक्या आणि ५ रिकाम्या असे एकूण ४९ हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले. सिलिंडर भरलेली (एमएच- ४१- एयू- ५२३९) चारचाकी तसेच (एमएच- ४१- बी- ३९७३) क्रमांकाची एक रिक्षाही जप्त करण्यात आली आहे.

कारवाईत एकूण ७ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयित फरार असून रात्री उशिरापर्यंत मनमाड पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे सहाय्यक निरीक्षक तुषार गरुड, हवालदार एस. जे. मुंगसे, डी. व्ही. भंवर, महिला पोलिस नाईक जयश्री सोनवणे, भूषण मोरे, अजय आव्हाड, तसेच मनमाड ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी कारवाई केली.

कारवाईकडे लक्ष

सदर सिलिंडर हे हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे असून ४९ सिलिंडर हे काळाबाजार करण्यासाठी कोणी दिले याची चौकशी होणे गरजेचे आहे. घरगुती वापरासाठी आलेले सिलिंडर अवैधरीत्या वापरले जात असतील तर यामुळे गॅस ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो.

त्यामुळे सदर गॅस सिलिंडर कोणाच्या नावावर देण्यात आले. कोणाकडून देण्यात आले याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. याबाबत पोलिस अथवा हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनी कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad : समुद्रात बोट बुडाली! बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, थरारक व्हिडीओ व्हायरल, अनेकजण बुडाले

Maharashtra Latest News Update: हिंजवडी परिसरातील आयटी कंपनीतील 82 कोटी रुपयांच्या डेटाची चोरी

Beed : सरकारी वकिलानं कोर्टातच संपवलं आयुष्य, सत्काराच्या शालने घेतला गळफास; बीडमध्ये खळबळ

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

SCROLL FOR NEXT