नाशिक

व.वा. वाचनालयाचा ‘बुक स्ट्रीट’ उपक्रम

CD
मेनफिचर टुडे पान चारसाठी --------- (सूचना : यापेक्षा चांगला फोटो मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे, मिळाल्यास नंतर टाकतो...(हा फोटो मात्र चार-पाच कॉलम वापरावा) ---- NSK26H35069 जळगाव : व. वा. वाचनालय व डोंबिवलीच्या पै फ्रेंडस्‌ लायब्ररी यांच्यातर्फे शहरातील काव्यरत्नावली चौकात रविवारी आयोजित ‘बुक स्ट्रीट’ उपक्रमात सहभागी होऊन पुस्तके घेताना वाचनप्रेमी नागरिक. -------- दहा हजारांवर वाचनप्रेमींची ‘बुक स्ट्रीट’वर प्रभातफेरी! ------ एकाच ठिकाणी लाखावर पुस्तके; व. वा. वाचनालय-पै फ्रेंडस्‌ लायब्ररीचा उपक्रम सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १५ : रविवारची रम्य पहाट.. दोन-चार दिवसांपासून आगमन झालेल्या गुलाबी थंडीची हुडहुडी. काव्यरत्नावली चौकात दिवाळीनिमित्त उभारलेल्या भव्य लामणदिव्याचा लख्ख सोनेरी प्रकाश आणि त्यात पाच वाजेपासूनच शहरातील वाचनप्रेमींची पाऊले काव्यरत्नावली चौकाकडे निघाली होती. भाऊंच्या उद्यानासमोरील रस्त्यावर नियोजनबद्ध रचनेत मांडून ठेवलेली लाखभर पुस्तकं नागरिकांची प्रतीक्षा करीत होते. निमित्त होतं व. वा. वाचनालय व डोंबिवलीच्या पै फ्रेंडस्‌ लायब्रबरी यांच्यातर्फे आयोजित ‘बुक स्ट्रीट’ उपक्रमाचं. सकाळच्या सहा तासांत दहा हजारांवर नागरिकांनी ‘बुक स्ट्रीट’वर प्रभातफेरी काढत आवडीची पुस्तके घेतली. जळगावात नव्हे, तर खानदेशात प्रथमच अशाप्रकारे साकारलेल्या ‘बुक स्ट्रीट’ उपक्रमाला पहाटे ५ ते सकाळी ११ या सहा तासांच्या वेळेत सुमारे १० हजार वाचनप्रेमींनी भेट दिली. पुस्तकं हाती घेऊन न्याहाळली अन्‌ आपल्या आवडीचं प्रत्येकी एक पुस्तक सोबत नेले. पुस्तकांचा हा मेळा म्हणूनच जळगावकरांसाठी अनोखा व वैशिष्ट्यपूर्ण ठरला. बहुभाषिक पुस्तकांची जत्रा ‘बुक स्ट्रीट’मध्ये विविध प्रकाशनांची बहुभाषिक पुस्तकांची जत्रा भरली होती. यात मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी अशा भाषांमधील धार्मिक, पौराणिक, इतिहास-भूगोलाची, सामान्य ज्ञान, आरोग्य, खाद्य पदार्थ, मनोरंजन, जागतिक घडामोडी, क्रीडा यांसह कथा- कादंबऱ्या, काव्यसंग्रह, साहित्य, आत्मचरित्र, जीवनचरित्रांसह विविध विषयांवरील लाखभर पुस्तकं मांडण्यात आली होती. विविध वृत्तपत्र, नियतकालिकांचे दिवाळीअंकही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. यांची होती उपस्थिती या भव्य पुस्तकमेळ्याचे उद्‌घाटन खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. प्रदीप जोशी, कार्याध्यक्ष व ज्यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला ते सीए अनिलकुमार शाह, उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. सुशील अत्रे, चिटणीस प्रा. शुभदा कुलकर्णी, कोषाध्यक्ष अभिजित देशपांडे, संगीता अट्रावलकर, अपर्णा भट-कासार, प्रभात चौधरी आदी उपस्थित होते. ----- (चौकट) साहित्यविषयक उपक्रमास अबालवृद्धांचा शिस्तबद्ध प्रतिसाद याआधी डोंबिवलीच्या पै फ्रेंडस्‌ लायब्ररीतर्फे डोंबिवलीसह पुणे, ठाणे अशा तीन ठिकाणीच अशा प्रकारचा ‘बुक स्ट्रीट’ भरविण्यात आला होता. उत्तर महाराष्ट्रात जळगावात प्रथमच हा उपक्रम राबविण्यात आला. जळगावकरांनी पहाटे पाचपासून अत्यंत शिस्तीत रांग लावून या उपक्रमात सहभाग घेतला. भाऊंच्या उद्यानापासून थेट आरटीओ कार्यालयापर्यंत शहरातील अबालवृद्ध वाचनप्रेमींची रांग लागली होती. ---- (चौकट) दहा हजारांवर वाचनप्रेमींची भेट पहाटे ५ ते सकाळी ११ अशा सहा तासांच्या वेळेत सुरवातीचे दोन तास म्हणजे ५ ते ७ यादरम्यान प्रतितास एक हजार नागरिक, तर नंतरच्या चार तासांत ७ ते ११ वाजेदरम्यान प्रतितास दोन-तीन हजार अशाप्रकारे सुमारे दहा हजारांवर वाचनप्रेमींनी ‘बुक स्ट्रीट’ला भेट देत पुस्तके घेतली. प्रत्येकालाच एकच पुस्तक मिळावे, या हेतूने नागरिकांकडून कुपन भरुन घेण्यात आले. -------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रुपाली चाकणकरांनी दिला कायदेशीर कारवाईचा इशारा; दिपाली सय्यद म्हणाल्या, 'हे किती हास्यास्पद!'

उद्यापासून ६ राशींचं नशीब चमकणार! आयुष्यात येणार आनंदाचे दिवस, धनलाभाचेही संकेत

Latest Marathi News Live Update : धुळ्यात क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त 'जनजातीय गौरव दिन' उत्साहात संपन्न

ENG vs AUS, 2nd ODI: इंग्लंडचा पलटवार! गस ऍटकिन्सनच्या माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचा डाव कोलमडला, तब्बल १३५ धावांनी पराभव

WPL 2027: ब्रेबॉर्न नाही, आता वानखेडेवर रंगणार फायनलसहित ११ सामने! BCCI चा मोठा निर्णय; पाहा खरं कारण काय?

SCROLL FOR NEXT