धुळे ः टुडे १ साठी
---
नगावच्या युवकावर प्राणघातक हल्ला
पाणी भरण्याच्या वादातून केले दोन्ही हात-पाय फ्रॅक्चर
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १३ ः विहिरीवरून पाणी घेतल्याच्या शुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एकावर कुऱ्हाडीने व लोखंडी पाइपने निर्घृण हल्ला करण्यात आल्याची घटना नगाव येथे घडली आहे. या भीषण हल्ल्यात जखमी व्यक्तीचे दोन्ही हात आणि पाय फ्रॅक्चर झाले असून, याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बापू संतोष पाटील (वय ४७, रा. नगाव, ता. धुळे) असे गंभीर जखमीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी बापू पाटील हे ८ नोव्हेंबरला दुपारी चारच्या सुमारास श्री महादेवाच्या मंदिरावर पाणी वाहण्यासाठी शेतातील विहिरीवरून बादलीभर पाणी भरत होते. या किरकोळ कारणावरून संशयित मेघराज सखाराम पाटील आणि सचिन मेघराज पाटील (दोन्ही रा. नगाव, ता. धुळे) यांनी बापू पाटील यांच्याशी वाद घातला व त्यांना अंगलट येत शिवीगाळ व मारहाण केली. वाढलेल्या वादात सचिन पाटील याने बापू पाटील यांच्या डोक्यात ठार मारण्याच्या उद्देशाने कुऱ्हाडीने वार केला. मात्र, बापू पाटील यांनी तो वार समयसूचकता दाखवून दोन्ही हातांनी अडवल्यामुळे त्यांचे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले. त्यानंतर मेघराज पाटील याने त्यांच्या पायावर लोखंडी पाइपने बेदम प्रहार करत त्यांना गंभीर दुखापत केली.
१४-१
पोलिस कारवाई
या हल्ल्यात बापू पाटील गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या फिर्यादीनुसार पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात दोन्ही संशयितांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक सुनील चौधरी तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.