nashik esakal
नाशिक

नाशिक : ...अन् जलकुंभ परिसरात अचानक उगवली गांजाची झाडे!

युनूस शेख

नाशिक : जुने नाशिक येथील पिंझरघाट भागातील जलकुंभ परिसरात गांजाची झाडे वाढली आहे. भविष्यात याच झाडांची शेती होण्यास वेळ लागणार नाही. शहरात विशेषतः: मध्यवर्ती भागात अशा प्रकारे गांज्याचे झाडे आढळून येणे ही गंभीर बाब आहे. यामुळे नागरिकांमध्ये खळबळ माजली आहे.

नशेबाजांकडून याच झाडाच्या पानांचा नशेसाठी वापर

अशा प्रकारचे झाडी जुने नाशिक परिसरात आढळून येत आहे. पिंझरघाट येथे असलेल्या मोकळ्या जागेत जलकुंभ आहे. जलकुंभ परिसरात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य आहे. विविध प्रकारची जंगली झाडे येथे वाढली आहे. त्यात गांजाच्या झाडांचादेखील समावेश आहे. थोड्या अंतरात तीन झाडी वाढली आहे. काही नशेबाज याच झाडाच्या पानांचा नशेसाठी वापर करत आहे. येथील वाढलेल्या जंगली झाडीमुळे परिसरात डासांचे प्रमाण वाढले आहे. याबाबत नागरिकांनी महापालिकेत तक्रार केली, तरीदेखील दुर्लक्ष होत आहे. महापालिका कर्मचाऱ्यांनी वेळीच तक्रारीची दखल घेत येथील स्वच्छता केली असतीतर कदाचित ही झाडेदेखील निघून गेली असती. जलकुंभ परिसरातील मोकळ्या मैदानावर खेळण्यासाठी येणारी मुले नशेच्या आहारी जाण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पोलिसांचेदेखील याकडे दुर्लक्ष झाले आहे. कोणी नसताना दुपारच्या सुमारास काही नशेबाज जलकुंभाच्या खाली गांजाचा नशा करण्यासाठी येऊन बसत असतात. परिसरातील रहिवाशांनी पोलिस ठाण्यातदेखील तक्रार केली आहे. तरीदेखील पोलिस याठिकाणी फिरकत नसल्याने नशेबाज पावले आहे. त्यांच्याकडून करण्यात आलेल्या कचऱ्यातून गांजाची झाडे वाढली असल्याची शक्यता रहिवाशांनी व्यक्त केली आहे.

पोलिस आणि महापालिका कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार

पोलिसांनी येथील गस्त वाढवून नशेबाजांवर पायबंद घालावा. महापालिका कर्मचाऱ्यांकडून येथील स्वच्छता करत गांजाची झाडे काढण्यात यावी. तसेच, यापुढे ते झाडे वाढणार नाहीत याची काळजी घ्यावी, अशी मागणी रहिवाशांनी केली. पोलिस आणि महापालिका कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. भविष्यात याच झाडांची शेती होण्यास वेळ लागणार नाही. ग्रामीण भागातील काही गावांमध्ये गांजाची शेती ग्रामीण पोलिसांना आढळून आल्याने त्यांनी त्वरित कारवाई करत ती उद्‌ध्वस्त केली होती

जलकुंभ खाली जमणाऱ्या नशेबाजांवर पोलिसांनी कारवाई करावी. महापालिका सफाई कर्मचाऱ्यांकडून येथील स्वच्छता करत गांजाची झाडे काढून घेण्यात यावी. - अफजल काझी, रहिवासी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथ

Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्सला धक्का! वैभव शतकानंतर फिल्डिंग करताना लंगडत गेला मैदानातून बाहेर; नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

SMT Heritage Scare: सीएसएमटी हेरिटेज स्थानकात ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांनी खळबळ; काळी जादू, सुरक्षा आणि वारसा संरक्षणावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT