ganja tree esakal
नाशिक

मालेगावी पाऊणेपाचशे किलो गांजा जप्त

प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : तालुक्यातील मोहपाडे- अस्ताने रस्त्यावरील मोहपाडे शिवारातील गुरुनानक श्रीचंद भगवान मंदिर ट्रस्टच्या शेतातील गट नं. ३ मध्ये तालुका पोलिसांनी मंगळवारी (ता. १४) रात्री छापा (Raid) टाकून सुमारे २४ लाख रुपये किंमतीचा पाऊणेपाचशे किलो गांजा (Ganja) जप्त केला. या प्रकरणी दोघा संशयितांना अटक करण्यात आली असून, मुख्य संशयिताचा शोध सुरु आहे. तालुका भागात एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजाची विक्री व साठवणूक होत असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. (cannabis seized of worth of 24 lakh in Malegaon Nashik crime News)

जिल्हा पोलिस अधिक्षक सचिन पाटील, अपर पोलिस अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक प्रदीपकुमार जाधव, तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक हेमंत पाटील व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. पोलिसांनी गांजाच्या तब्बल १७ गोण्या जप्त केल्या. या प्रकरणी महेशमुनी उदासीन (रा. टोकडे) व काळू शिरसाठ (रा. खडकी) या दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. अस्लम शेख इस्माईल उर्फ अस्लम गांजावाला (रा. मालेगाव) हा मुख्य संशयित फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. किल्ला पोलिस शहरातील एका गुन्ह्यात संशयितांचा शोध घेत असताना त्यांना याबाबत माहिती मिळाली. तालुका पोलिसांना त्यांनी ही माहिती दिल्यानंतर श्री. पाटील व सहकाऱ्यांनी छापा टाकून ही कारवाई केली.

पोलिसांना कारवाईत सफेद रंगाच्या गोणीत चौकोणी ठोकळे असलेला उग्र वासाचा गांजा मिळून आला. सफेद रंगाच्या गोणीत खाकी चिकटपट्टीच्या मदतीने हे ठोकळे चिटकविण्यात आले होते. या कारवाईची माहिती मिळाल्यानंतर श्री. खाडवी, श्री. जाधव यांनी घटनास्थळी भेट देवून पहाणी केली. अस्लम गांजावाला याने त्याच्या मालकीचा हा गांजा महेशमुनी व काळू यांच्याकडे विक्री करण्यासाठी दिल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी रात्री उशिरा कारवाई केल्यानंतर गांजाची मोजणी केली. मोजणी व खात्री केली. बुधवारी पहाटे या प्रकरणी पोलिस नाईक किशोर नेरकर यांच्या तक्रारीवरुन तालुका पोलिस ठाण्यात तिघा संशयितांविरुध्द अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SLC XI Warm up: टीम इंडियाने सहज जिंकला सराव सामना! आता सुरू होणार खरी परीक्षा, पाहा कसोटी मालिकेचे वेळापत्रक

Buldhana Accident: खदाणीच्या पाण्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मेहकर तालुक्यातील कोराडी प्रकल्पाजवळील घटना

फोटो काढायला आली अन् Kiss करून गेली! चाहतीचं भयंकर कृत्य पाहून घाबरली अभिनेत्री, Viral Video

Bhokardan Accident: भोकरदन-वालसावंगी मार्गावरील धोकादायक विहिरी ठरताहेत मृत्यूचा सापळा; कार विहिरीत कोसळून दोन महिलांचा मृत्यू

Ambad Accident: खंडोबाची वारी मागण्यासाठी आले अन् काळाचा घाला; अंबडमध्ये टेम्पोच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT