transgender fight nashik esakal
नाशिक

नाशिक : तृथीयपंथीयांची टोल नाक्यावर सतत बळजबरी? वाद टोकाला

हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक रोड : नाशिक- सिन्नर टोल वेज लिमिटेड या शिंदे येथे (nashik-sinner toll naka) असणाऱ्या टोल नाक्यावर पैसे मागण्याच्या कारणावरून काल (ता.१७) तृतियपंथीय आणि तीन वाहनचालकांमध्ये फ्री स्टाईल (transgender fight) हाणामारी पाहायला मिळाली. या वेळी बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (social media) झालेला होता. यानंतर तृतियपंथीय वाहनचालकांकडून सतत बळजबरी पैसे मागून त्यांना त्रास देतात शिवाय पैसे दिले नाही तर मारहाण करतात, अशी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील शोध नाशिक रोड पोलिस घेत आहेत

तीन वाहनचालक गाडी नाक्यावरच सोडून निघून गेले

नाशिक- सिन्नर हायवे वर असणाऱ्या शिंदे जवळ दुपारी तीनच्या सुमारास तृतीयपंथीय व तीन वाहक संचालकांमध्ये पैशाच्या कारणावरून फ्री-स्टाईल हाणामारी झाली. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. टोल प्रशासनाने तृतीयपंथीय यांचा त्रास होत असल्याचे पत्र नाशिक रोड पोलिस ठाण्याला दिले असून पुढील कारवाई पोलिस करीत आहेत. या संदर्भात नाशिक- सिन्नर टोल वेज लिमिटेड या कंपनीने पोलिस प्रशासनाला पत्र देऊन किन्नर लोकांचा त्रास होत असल्याची तक्रार केली आहे. दरम्यान तीन वाहनचालक गाडी नाक्यावरच सोडून निघून गेल्याचे टोल व्यवस्थापनाने सांगितले आहे.

आम्ही घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिस विभागाला दिले आहेत.पत्राद्वारे तृतियपंथीय बांधवांकडून होणारा त्रास कमी करण्याची विनंती केली आहे. - नानक लुल्ला, टोल व्यवस्थापक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Revenue Court: महसूल न्यायालयाचे कामकाज मराठीतून, नवी 'एसओपी' लागू; प्रकरणांचा झटपट निपटारा होणार!

Nashik Drowning: ३ मुलं डोळ्यासमोर गटांगळ्या खायला लागली, आईने वाचवायला उडी मारली; बुडून चौघांचाही मृत्यू..

Mobile Recharge Hike : लवकरच मोबाईल रिचार्ज महाग होण्याची शक्यता, पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर दुसरा मोठा धक्का

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

मी सागरची गर्लफ्रेंड, हळदीच्या कार्यक्रमात राडा; ८ लाखांचा खर्च, लग्न मोडताच वधुची पोलिसात धाव, नवरदेवाला अटक

SCROLL FOR NEXT