Bribe crime esakal
नाशिक

Bribe Crime Case : पोलिस निरीक्षकासह तिघांवर लाच मागितली म्हणून गुन्हा दाखल

प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : एमडी पावडर या नशेच्या अंमली पदार्थांशी संबंधित असल्याच्या संशयावरून दोघांवर कारवाई करू नये यासाठी लाखाची मागणी करून तडजोडीत २० हजार रूपये मागणी केल्याचे आरोपावरून पोलिस निरीक्षक, पोलिस व मध्यस्थी सामाजिक कार्यकर्ता या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली आहे. नाशिक विभाग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश घुसर (रा. सोयगाव), पोलिस शिपाई आत्माराम पाटील (रा. पोलिस काॅलनी) व मध्यस्थी राशीद सैय्यद रफीक (रा. इस्लामपुरा) यांचा संशयीतांमध्ये समावेश आहे. (case registered against three police inspector for demanding bribe nashik Latest Crime News)

संशयीत जेवण करून घरी परतत असताना ते एमडी या नशेच्या पदार्थाशी संबंधित आहेत. या कारणावरून त्यांना शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी तक्रारदार यांचा भाऊ व त्याचे दोन मित्र यांचेसाठी सुरुवातीस एक लाख रुपये नंतर तक्रारदार यांचा भाऊ व त्याचा एक मित्रासाठी पन्नास हजार रुपये मागणी करण्यात आली होती. तडजोडीत भावासाठी वीस हजार रुपये मागणी करण्यात आली होती म्हणून हा गुन्हा दाखल झाला.

पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर अधीक्षक नारायण न्याहळदे , उपअधी‌क्षक सतीश भामरे, संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गायत्री जाधव, हवालदार एकनाथ बाविस्कर, मनोज पाटील, पोलिस शिपाई संजय ठाकरे, नितीन नेटारे, संतोष गांगुर्डे यांनी ही कारवाई केली. तिघा संशयीतांची चौकशी सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT