Krushna Tanpure esakal
नाशिक

Nashik News: सुवर्णपदक विजेत्या कृष्णाला केंद्राचा आर्थिक मदतीचा हात; मंत्री डॉ. भारती पवार यांचा पाठपुरावा

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : आडगाव रेपाळसारख्या ग्रामीण भागातील खेळाडू कृष्णा तनपुरे यास केंद्र सरकारमार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय कल्याण निधी योजनेतून १ लाख ५० हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी यासाठी पाठपुरावा केला. (Center lends financial support to gold medalist Krishna Minister Pursuit of Dr Bharti Pawar Nashik News)

कृष्णा २५ टक्के दिव्यांग श्रेणीत असून त्याने पॅराट्रायथलॉन वर्ल्ड कप या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक आणि कांस्यपदक पटकावण्याची कामगिरी केली होती.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुण खेळाडूंनी ॲालिम्पिकमध्ये सहभागी होऊन सुवर्णपदकांना गवसणी घालावी, असे स्वप्न पाहिले असतानाच अबुधाबीत झालेल्या दिव्यांगांसाठीच्या वर्ल्ड कपमध्ये कृष्णाने कांस्य आणि २३ वर्षांखालील गटात सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

पॅराट्रायथलॉनच्या वर्ल्ड कपमध्ये पदक मिळवणारा तो पहिला दिव्यांग भारतीय ॲथलिट ठरला आहे, ही गौरवाचे बाब आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पॅराट्रायथलॉन या खेळात सातत्य टिकवण्याच्या सरावासाठी लागणारा खर्च कृष्णा तनपुरे यांना आर्थिकदृष्टया परवडणार नसल्याने त्‍यांनी मदतीसाठी अर्ज केला होता. त्यांच्या अर्जाची दखल घेऊन केंद्रीय खेल मंत्र्यांना आर्थिक मदत देण्यासाठी विनंती करण्यात आली होती.

त्यानुसार या पॅराट्रायथलॉन खेळाडूस ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय कल्याण निधी योजना अंतर्गत एक लाख ५० हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य मंजूर करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली आहे.

दरम्यान या क्रीडाप्रकारासाठी येणारा खर्च खूप मोठा आहे, त्यामुळे दानशुरांनी त्याला मदत करीत प्रोत्साहन द्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Gaming: PokerBaazi कंपनीचा शेअर कोसळला, 2 दिवसांत 20 टक्के घसरण; गुंतवणूकदारांचे 2,000 कोटी रुपये बुडाले

Viral Video: इंस्टा जाम, गुलाबी साडीत किन्नरचं सौंदर्य... सोशल मीडियावर धुमाकूळ, चक्क ६.२५ कोटी लोक झाले फिदा!

रोहितनंतर सूर्यकुमार यादवचीही विकेट पडणार? गौतम गंभीर 'लाडक्या'ला कर्णधार करणार

Maharashtra Latest News Update: इंडिया अलायन्सचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला

Video : तुम्हीपण असा डबा वापरता काय? बाबांनो, जेवणाचं होईल विष, धक्कादायक व्हिडिओ पाहा

SCROLL FOR NEXT