kalika mata  esakal
नाशिक

Nashik Kalika Yatrotsav : दररोज दीड लाख भाविकांच्या हजेरीची शक्यता; यात्रोत्सवात 50 सीसीटीव्ही, 40 महिला बाऊन्सर

सकाळ वृत्तसेवा

Nashik Kalika Yatrotsav : नवरात्रोत्सवात अतिप्राचीन श्री कालिका देवीच्या दर्शनाला दरवर्षीपेक्षा अधिक गर्दीचा अंदाज असून, पहिली माळ ते शेवटच्या माळेपर्यंत दररोज सरासरी दीड लाख भाविक देवीच्या चरणी लीन होतील.

शेवटच्या दिवसात गर्दीचा उच्चांक वाढणार असल्याने गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांसह मंदिर संस्थानकडून शंभर स्वंयसेवक व चाळीस महिला बाऊन्सर नियुक्त केल्या जाणार आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने लक्ष ठेवण्यासाठी कायमस्वरूपी ३५, तर नव्याने १५ असे पन्नास सीसीटीव्ही कॅमेरे राहणार आहे. (Chances of attendance of one and half lakh devotees everyday kalika yatrotsav nashik news)

ग्रामदैवत श्री कालिका माता यात्रोत्सवाला रविवार (ता. १५) पासून प्रारंभ होत आहे. मागील दोन वर्षात कोरोनामुळे गर्दी रोडावली होती. २०२०, २०२१ मध्ये कोरोनामुळे गर्दीवर निर्बंध आले. त्यामुळे भाविकांना मंदिराचे दरवाजे बंद होते. २०२२ मध्ये निर्बंध उठल्यानंतर गर्दी उसळली. ताशी सहा ते सात हजार भाविक मंदिरात दर्शन घेत होते, असा अहवाल मंदिर संस्थानचा आहे.

यंदा पूर्णपणे मोकळे वातावरण असल्याने गर्दी उसळेल. ताशी दहा हजारापर्यंत भाविकांचा आकडा पोचेल. चोवीस तासात दीड ते पावणेदोन लाख भाविक दर्शन घेतील. सातव्या व नवव्या माळेला गर्दीचा उच्चांक होईल असा अंदाज असल्याने पोलिसांच्या मदतीला संस्थानने गर्दीचे नियोजन व नियंत्रण करण्यासाठी शंभर स्वयंसेवकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

चाळीस महिला बाऊन्सर व पन्नास सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. भाविकांच्या मागणीनुसार यंदा नवरात्रोत्सव कालावधी चार दिवसांनी वाढविण्यात आला आहे. २८ ऑक्टोबरपर्यंत उत्सव होईल.

तीन कोटींचा विमा

श्री कालिका देवी मंदिर संस्थानकडून यंदाही भाविकांचा दोन कोटी रुपयांचा विमा उतरविण्यात आला आहे. तर देवीच्या दागिन्यांचा एक कोटी रुपयांचा विमा उतरविण्यात आला आहे.

"दरवर्षापेक्षा यंदा गर्दी वाढणार आहे. सरासरी दररोज पावणेदोन लाख भाविक दररोज येतील. शेवटच्या दिवसात गर्दी वाढेल, असा अंदाज आहे. त्या दृष्टीने पोलिसांबरोबरच संस्थांकडूनदेखील नियोजन करण्यात आले आहे." - केशव पाटील, अध्यक्ष, श्री कालिका देवी मंदिर संस्थान.

असे आहे मुख्य नियोजन

- १५ ऑक्टोंबर- पहाटे साडेतीन वाजता आरती, सकाळी साडेपाच वाजता कलशपूजन, ध्वजारोहन, सकाळी सहा वाजता घटस्थापना. रात्री साडेअकरा वाजता महाआरती व शृंगार व वस्त्रालंकार सोहळा.

(दररोज पहाटे साडेतीन वाजता काकड आरती.)

- दुपारी दोन ते चारदरम्यान गजर व घागरी फुकणे, कडकणीचा फुलोरा अर्पण.

- २२ ऑक्टोंबर अष्टमी दुपारी तीन ते सांयकाळी सात वाजता होमहवन व आरती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT