Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal esakal
नाशिक

राजकारणात अतिक्रमण केल्यास उपाय कोणता?भुजबळांचा मिश्कील सवाल

सकाळ वृत्तसेवा

निफाड (जि.नाशिक) : शेजाऱ्याने केलेल्या अतिक्रमणाबाबत कायदेशीर उपाययोजना आहेत, मग राजकारणात जर कोणी अतिक्रमण करत असेल तर त्यावर कोणती उपाययोजना करावी? असा मिश्किलप्रश्‍न पालकमंत्री तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ (Food and Civil Supplies Minister Chhagan Bhujbal) यांनी निफाडच्या वकिलांच्या शिष्टमंडळाला केला. भुजबळांच्या हजरजबाबीपणाबद्दल जाणून असलेल्या वकिलांनाही क्षणभर काय बोलावे हे सुचले नाही.

महाराष्ट्र व गोवा वकिल परिषद (Maharashtra and Goa Advocates Council) आणि निफाड वकिल संघातर्फे रविवारी (ता.६) कायदेविषयक कार्यशाळा आणि ॲड. इंद्रभान रायते लिखित अतिक्रमण कायदा व उपाय (Encroachment laws and measures) या पुस्तक प्रकाशनास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण देण्यास निफाडच्या वकिलांचे शिष्टमंडळ येवला (Yeola) संपर्क कार्यालयात गेले होते, त्यावेळी कार्यक्रमाची रुपरेषा जाणून घेत ॲड. रायते यांनी सोप्या शब्दात लिहिलेल्या ‘अतिक्रमण कायदा व उपाय' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार असल्याची माहिती वकिलांनी दिली, त्यावर मंत्री भुजबळांनी शेतीतील अतिक्रमणावर उपाय आहेत, मात्र राजकारणातील‌ अतिक्रमणावर काय उपाय करावा असा मिश्किल प्रश्‍न केला अन एकच हास्यकल्लोळ उडाला.

याप्रसंगी निफाड वकिल संघाचे माजी अध्यक्ष ॲड. रायते, निफाड वकिल संघाचे अध्यक्ष ॲड. अंबादास आवारे, माजी अध्यक्ष ॲड. अण्णासाहेब भोसले, उपाध्यक्ष ॲड. शरद नवले, सचिव ॲड. रामेश्वर कोल्हे, ॲड. वाल्मिकराव गायकवाड, ॲड. प्रवीण ठाकरे, ॲड. पुंडलिक काळे, ॲड.संजय दरेकर, ॲड. रामचंद्र गाजरे, ॲड.रामनाथ शिंदे आदी वकिल बांधव उपस्थित होते. कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित राहण्याबाबत भुजबळांनी वकिल संघाचे शिष्टमंडळाला सूचित केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT