नाशिक

धकाधकीच्या युगात मुले होताहेत लवकर ‘मोठी’

CD
एन्कर (यात सचिन जोशी यांची प्रतिक्रिया येईल, जागा ठेवावी) लोगो : बालदिन विशेष बालपण हरवतंय... मुले झपाट्याने होताहेत मोठी आभासी दुनियेचा विळखा; बदलती जीवनशैली, अवेळी येणारी परिपक्वता सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १३ : डिजिटल युग आणि धकाधकीच्या जीवनशैलीत आजच्या मुलांचे भावविश्व झपाट्याने बदलत आहे. पूर्वीचे निरागस बालपण मागे पडून मुले कमी अवधीतच वयात येत आहेत. वैद्यकीयदृष्ट्या मुलांमध्ये हार्मोन्स बदलण्याचे प्रमाण वाढले असून, त्यामुळे मुले अवेळी परिपक्व होऊ पाहत आहेत. कमी वयातच सर्व प्रकारचे स्वातंत्र्य मिळावे, अशी त्यांची तीव्र इच्छा असते. दुसरीकडे, बदलती मानसिकता पाहता मतदानाचे आणि वाहन चालविण्याच्या परवान्याचे वय कमी करण्याबाबतही काही राज्यांच्या स्तरावर विचारमंथन सुरू आहे. मात्र, या झटपट मोठे होण्याच्या प्रक्रियेत बालपणाचा खरा आनंद हरवत चालला आहे का, असा सवाल या बालदिनी उपस्थित होत आहे. या एकूणच गोष्टींबाबत दहावीमधील प्रतिक्षासोबत बोलण्याचा प्रयत्न केला असता, आम्हाला आमच्या विचारांचे स्वातंत्र्य हवे आहे. अनुभवानुसार मोठी माणसे अनेक गोष्टी आमच्यावर थोपावतात परंतु आम्हाला आमचे बघू द्यायला हवे. असे उत्तर आले. नववीला असलेल्या आर्यासोबत सामान्य ज्ञानाच्या बाबत बोलले असता, रिलस्टार आणि एन्फ्लूएंजर यांनाच आम्ही फॉलो करतो कारण आम्ही दिवसभर त्यांच्याबरोबरच राहतो, तेच आम्हाला गाईड करतात. खाण्याचे किंवा फिरण्याचे ठिकाणदेखील तेच आम्हाला सांगतात, असे ती म्हणाली. ही दोन प्रातिनिधीक उदाहरणे पाहिली असता, झटपट मोठे होण्याच्या प्रक्रियेत बालपणाचा खरा आनंद हरवत चालला आहे, यावर शिक्कामोर्तब होते. या बदलत्या वास्तवाचा वेध घेण्यासाठी शिक्षकांशी संवाद साधला असता अत्यंत महत्त्वाची निरीक्षणे त्यांनी नोंदवली. याबाबत योगेश सूर्यवंशी म्हणाले की, ‘आजची मुले तंत्रज्ञानामुळे वयापेक्षा जास्त माहिती घेत आहेत. त्यांना प्रत्येक गोष्टीत स्वातंत्र्य हवे असते. पण, शारीरिक वाढीसोबत भावनिक परिपक्वता नसल्याने अनेकदा त्यांची गल्लत होते, हे पालकांनी समजून घ्यायला हवे.’ हार्मोन्सबाबत वैशाली जाधव म्हणतात की, ‘मुलींमध्ये हार्मोन्सचे बदल लवकर होत असल्याने त्यांच्या वागण्यात आणि विचारांत झपाट्याने फरक दिसतो. कमी वयातच मोठ्यांसारखे वागण्याचा त्यांचा कल असतो. अशा वेळी त्यांना संवादातून योग्य दिशा देणे अत्यंत गरजेचे आहे.’ निर्णयक्षमता आणि प्रगल्भता याबाबत दिगंबर देवढे म्हणाले की, ‘वाहन परवाना किंवा मतदानाचे वय कमी करण्याचा विचार होत असला, तरी मुलांची निर्णयक्षमता तितकी प्रगल्भ झाली आहे का, हा प्रश्नच आहे. अवेळी येणाऱ्या स्वातंत्र्यामुळे मुले जबाबदारीपेक्षा अधिकारांचाच जास्त विचार करू लागली आहेत. मात्र हे सर्व असताना स्क्रीन टाइम संदर्भात शिक्षकांना विचारले असता, अर्चना कापसे म्हणाल्या की, ‘मैदानी खेळ कमी होऊन स्क्रीन टाइम वाढल्याने मुलांचे भावविश्व आभासी झाले आहे. ताणतणाव सहन करण्याची क्षमता कमी होत आहे. मुलांना त्यांच्या वयानुसारच जगू दिले, तरच त्यांचे बालपण खऱ्या अर्थाने समृद्ध होईल. --- चौकट का बदलतोय निसर्गक्रम? आहारातील बदल, फास्ट फूडचे वाढते प्रमाण, मोबाइलचा अतिवापर आणि अपुरी झोप यामुळे मुलांच्या शरीरातील हार्मोन्सवर परिणाम होत आहे. परिणामी, वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षीच शारीरिक आणि मानसिक बदलांची सुरुवात होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ---चौकट भावविश्वाशी जोडणे गरजेचे १६ व्या वर्षी वाहन परवाना आणि मतदानाच्या वयाबाबत चर्चा सुरू असताना, मुलांना स्वातंत्र्य नक्की द्यावे; मात्र त्यासोबतच जबाबदारीची जाणीव करून देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. पालकांनी मुलांचे मित्र होऊन त्यांच्या भावविश्वाशी जोडलेले राहणे, हीच काळाची गरज आहे. ---कोट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NTA Reform: NEET मधील पेपरफुटीनंतर मोठा निर्णय; गैरप्रकार रोखण्यासाठी आता थेट लष्करी अधिकाऱ्यांना...

IND vs NZ: शेवटच्या वनडेत खेळणार नाही मॅट हेन्री, विराट कोहलीने जर्सी भेटही दिली; पण कारण काय?

आयुष्मान कार्डधारकांना धक्का! आता ११२ आजारांवरील उपचार खासगी रुग्णालयांत होणार नाहीत, मोदी सरकारचा प्रस्ताव

JEE Advanced 2027 ची तारीख जाहीर; 23 मे रोजी होणार परीक्षा, IIT दिल्लीकडे आयोजनाची जबाबदारी

Latest Marathi News Live Update: दूध विक्रीच्या दरामध्ये मोठी वाढ, प्रति लिटर ४ रुपयांनी महागले

SCROLL FOR NEXT