childrens left father in smashan esakal
नाशिक

मुलांनी वाऱ्यावर सोडलेला जन्मदाता चितेवर रचतोय लाकडं..

प्रमोद दंडगव्हाळ

नाशिक : ‘इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते,’ कविवर्य सुरेश भट यांची ही कविता... या काव्यपंक्तीला अनुसरून अशी हृदयद्रावक घटना सध्या सिडकोतील स्मशानभूमीत खितपत जीवन जगत असलेल्या रामभाऊ यांच्याकडे पाहून बघायला मिळते. मरणाअगोदरच जिवंतपणी जन्मदात्याला ‘स्मशानभूमीत’ जीवनाचा उत्तरार्ध काढण्याची वेळ येत आहे. पोटाची मुलं नाशिकमध्ये वास्तव्यास असतानाही ही पित्याची अवस्था, याचे उत्तर मात्र तूर्त तरी बाप लेकांकडेच आहे. (childrens-left-father-in-smashan-nashik-marathi-news)

गोतावळा मोठा पण सांभाळ कुणी करेना

स्थळ सिडकोतील उंटवाडी अमरधाम... नाव रामभाऊ पुंजाजी अवचार... वय ८१... मूळ राहणार मालेगाव, जिल्हा वाशीम. रामभाऊंना तीन मुले. तिघांचीही लग्न झालेली. त्यापैकी मोठा मुलगा गावाकडे, तर मधला मुलगा नाशिक शहरात राहतो. लहान मुलगा सिडकोतील सावतानगर परिसरात आपल्या कुटुंबासह राहत आहे. रामभाऊ यांचा गोतावळा तसा मोठा आहे. गावाकडचे घर मोठ्या मुलाने विकून टाकले. साडेतीन एकर शेती होती. तीही विकली गेली. १९९८ मध्ये ते पत्नीसह नाशिकमध्ये रोजगारासाठी आले. सुरक्षारक्षक, गवंडी असे पाहिजे ते काम करून त्यांनी आपल्या संसाराचा गाडा ओढला. त्यांच्या पाठोपाठ दोन मुलेही नाशिकमध्ये आली. त्यांची लग्नही झाली. कालांतराने रामभाऊच्या पत्नी दुर्दैवाने हरवल्या. त्यांना शोधण्यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले. परंतु त्यांच्या पदरी निराशा आली. हळूहळू वार्धक्य आले. ज्या वेळी मुलांना त्यांना सांभाळण्याची वेळ होती त्यावेळी मुलांनी त्यांना वाऱ्यावर सोडून दिले.

'जिवंत आहेत की मेले' बघण्यासाठी येतात मुले

रामभाऊ यांनी सध्या वयाची ८० वर्षे पूर्ण केली आहेत. मुलांनी त्यांना जिवंतपणीच सिडकोतील उंटवाडी स्मशानभूमीत सोडून दिले आहे. स्मशानभूमीत येणाऱ्या मृतदेहांवर सरण रचण्याचे ते अधूनमधून काम करतात. लोकही त्यांना पोटापाण्यासाठी पैसे देतात. त्यावर ते गुजराण करतात. परंतु सद्यःस्थितीत रामभाऊ वार्धक्याने पूर्णतः मरणासन्न झाले आहेत. त्यांची मुलेदेखील ते जिवंत आहेत की मेले आहेत, एवढेच बघण्यासाठी येताना दिसतात, असे ते खुद्द सांगतात. जीवनाच्या शेवटच्या प्रवासातही माझ्या नशिबी दु:ख असल्याची प्रतिक्रिया रामभाऊ यांनी ‘सकाळ’ शी बोलताना दिली.

(childrens-left-father-in-smashan-nashik-marathi-news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT