नाशिक

खंडणीसाठी चॉपरहल्ला; दीड हजार लुटले

CD
खंडणीसाठी चॉपर हल्ला; दीड हजार लुटले --- खान्देश मिल कॉम्प्लेक्स परिसरातील घटना; एक ताब्यात, दोघे फरार सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १३ : आनंद मेळा सुरू करण्यासाठी पैशांची मागणी करीत तिघांनी मेळा आयोजकासह एका तरुणाला खान्देश मिल कॉम्प्लेक्स परिसरात मारहाण केली. आयोजकावर चॉपरने वार करून त्याच्या खिशातील दीड हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. ही घटना गुरुवारी (ता. १२) रात्री घडली. अरबाज शकील शेख (वय २६, रा. उस्मानिया पार्क) यांनी खान्देश मिल कॉम्प्लेक्स परिसरात आनंद मेळा भरविला आहे. गुरुवारी रात्री तीन जण मेळ्याच्या ठिकाणी आले. त्यांनी अरबाज शेख यांच्याशी वाद घालत पैशांची मागणी केली. वाद वाढल्यानंतर तिघांनी शेख यांना मारहाण केली व चॉपरने वार केले, तसेच त्यांच्या खिशातील दीड हजार जबरदस्तीने काढून घेतले. मोहंमद अनस खान खलील खान (रा. शाहूनगर) यांनी हस्तक्षेप केला असता, हल्लेखोरांनी त्यांनाही मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तिघांपैकी एका संशयिताला ताब्यात घेतले, तर अन्य दोघे घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. याबाबत अरबाज शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nvidia Share Crash: एनव्हीडियाचा शेअर कोसळल्याने १३ भारतीय म्युच्युअल फंड अडचणीत? तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?

Marathwada Drought Relief : भीषण दुष्काळात बळीराजाच्या चेहऱ्यावर हसू! 'या' मोठ्या धरणातून दोन्ही कालव्यांत पाणी सोडले, रब्बी पिकांना मिळणार जीवदान!

Job Alert: केंद्र सरकारच्या 'या' विभागात १,३९३ जागांची मेगा भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची तारीख

पंतप्रधान मोदींच्या नावाने ऑनलाईन फ्रॉड; एका मेसेजमुळे बँक खातं होऊ शकतं रिकामं, नेमका विषय काय?

Latest Marathi News Live Update: देश-विदेशातील दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT