citizen Enjoy melodious music early morning of Bhaubeej pahat nashik news esakal
नाशिक

Bhaubeej Pahat: भाऊबीज पहाट सुरेल गीतांचा संगम; दिपोत्सवात नाशिककरांना लाभतेय संगीत पर्वणी!

सकाळ वृत्तसेवा

Bhaubij Pahat: दिपोत्सव उत्सवात नाशिककरांना भाऊबीजेच्या पहाटे सुरेल संगिताच्या मैफिलीचा आस्वाद मिळाला.

युवक मित्र मंडळातर्फे मुंबई नाका परिसरात भाऊबीज पहाट कार्यक्रमाचे बुधवारी (ता. १५) आयोजन करण्यात आले होते. (citizen Enjoy melodious music early morning of Bhaubeej pahat nashik news)

सागर म्हात्रे, श्वेता दांडेकर, गौरी गोसावी, संदीप थाटसिंगार, मनीष ठुंबरे या गायकांच्या सुरेल गायनाने मैफिल रंगतदार झाली. सुर निरागस हो... गीताने मैफिलीला प्रारंभ झाला अन् उपस्थित सारे रसिक श्रोते सुरांच्या सप्त सागरात रमले. विठू माऊली, रखुमाई- रखुमाई, खेळ मांडला यांसारख्या सुमधुर गीतांचे कलावंतांनी सादरीकरण केले.

तबला व ढोलकी वादन अमोल पाळेकर व मनिष ठुंबरे यांनी केले. गंगा हिरेमठ यांनी ढोलक तर सुशील केदारे यांनी ऑक्टोपॅ़ड वादन केले.

प्रसाद पात्रे, जयेश भालेराव यांनी किबोर्ड वादन केले. चैतन्य पाळेकर यांनी ताल वाद्य वादन केले. संतोष फासाटे यांनी निवेदन केले.

यावेळी माजी आमदार वसंत गिते, प्रथमेश गिते यांची उपस्थिती होती. किरण मोटाकरी, किशोर परदेशी, प्रशांत भदाणे, स्वनिल मोटकारी, संदीप हिरवे, गणेश मोरे, मयूर गिते,वैभव शेवालें, स्वराज गाड़े, प्रतिक गिते यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. भाऊबीजेच्या औचित्यावर या सुरेल मैफिलीचा आस्वाद घेण्यासाठी रसिक श्रोते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

Latest Marathi News Live Update : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावर लांबच लांब रांगा

"शाहरुख खानने राडा कर दिया"; २०१२ मध्ये वानखेडेवर नेमकं काय घडलं? माजी ACP नी सर्व सांगितलं; म्हणाले, मी त्याला म्हटलंही, सर प्लीज...

भारतात सोन्याचं दर कमी होणार? RBI ने देशात परत आणलं १०४ टन सोनं

SCROLL FOR NEXT