corona vaccination corona vaccination
नाशिक

'स्पुटनिक'कडे नाशिककरांची पाठ; मोफत लस घेण्याकडेच कल

विक्रांत मते

नाशिक : कोरोना संसर्गाला अटकाव करण्यासाठी प्रतिबंधक लस महत्त्वाची ठरत असल्याने नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात केंद्रांवर गर्दी होत आहे. परंतु, खासगी रुग्णालयांमध्ये कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सिन व्यतिरिक्त स्पुटनिक लस उपलब्ध असतानाही खर्च करून लस टोचण्याकडे नाशिककरांनी पाठ फिरविली आहे. स्पुटनिकचा आतापर्यंत पहिलाच डोस देण्यात आला असून, तीन हजार ६०३ नागरिकांनी ही लस टोचून घेतली आहे. सर्वाधिक कोव्हिशील्ड लशींची टोचणी झाली असून, त्या खालोखाल कोव्हॅक्सिनची मागणी आहे. (citizens prefer to get free corona vaccine than sputnik vaccine)

१६ जानेवारीपासून देशभरात लसीकरण मोहीम सुरू झाली. पहिल्या टप्प्यात हेल्थवर्कर, फ्रंटलाइन वर्कर, तसेच साठ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर ४५ वयोगटापुढील नागरिकांसाठी लसीकरण सुरू झाले. १ मेनंतर अठरा वर्षांपुढील सर्वांसाठी लसीकरणाची घोषणा करण्यात आल्यानंतर केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली, परंतु लशींचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने मोहीम बारगळली. महापालिकेकडून शहरात ४२ केंद्रांच्या माध्यमातून लसीकरण सुरू होते, परंतु त्यानंतर वाढ होत सध्या १२९ केंद्रांवर मोहीम सुरू आहे. यात कोव्हिशील्ड व कोव्हॅक्सिन लशींचा पुरवठा होत आहे, तर खासगी रुग्णालयांमध्ये स्पुटनिक लस दिली जात आहे. १४ खासगी रुग्णालयांमध्ये आता पर्यंत कोव्हिशील्डचे एक लाख ७, ६५२, तर कोव्हॅक्सिनचे बारा हजार ८४७ डोस देण्यात आले. स्पुटनिकचे ३, ६०३ डोस देण्यात आले. महापालिकेच्या रुग्णालयामध्ये सर्वाधिक पाच लाख ६० हजार ३१७ डोस देण्यात आले, तर खासगी रुग्णालयांमध्ये एक लाख २४ हजार १०२ डोस देण्यात आले.

लसीकरणाची स्थिती (महापालिका व खासगी)

- कोव्हिशील्ड - ५,८५, ६४५

- कोव्हॅक्सिन - ९५, १७१

- स्पुटनिक - ३, ६०६

(citizens prefer to get free corona vaccine than sputnik vaccine)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT