Citylinc esakal
नाशिक

Shasan Aplya Dari Citylinc Bus : ‘शासन आपल्या दारी’ साठी 75 बस

सकाळ वृत्तसेवा

Shasan Aplya Dari Citylinc Bus : राज्य शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमासाठी लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी पोचविण्यासाठी सिटीलिंक कंपनीकडून ७५ बसची व्यवस्था करण्यात आली आहे.

त्याचबरोबर शहरात ५८ पीक-अप पॉइंट तयार करण्यात आले आहे. १५ जुलैला डोंगरे वसतिगृह मैदानावर शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार आहे. (Citylinc 75 buses for Shasan Aplya Dari Nashik)

कार्यक्रमासाठी नाशिक महापालिकेला ५ हजार लाभार्थी आणण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. राष्ट्रीय उपजीविका अभियान, स्वनिधी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, समाजकल्याण विभाग, महिला व बालकल्याण विभाग अशा विविध विभागाकडून लाभार्थी निमंत्रित करण्यात आले आहे.

लाभार्थ्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी आणण्यासाठी सिटीलिंकने ५८ पीक- अप व ड्रॉप पॉइंट तयार केले आहे त्यासाठी ७५ बसची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. कार्यक्रमानंतर बसमधून लाभार्थ्याला पुन्हा सोडले जाणार आहे.

प्रत्येक बससाठी दोन संपर्कप्रमुख असतील. बस क्रमांकासह संपर्कप्रमुखाचे नाव, मोबाईल नंबर बसवर राहील. नाशिक पूर्व विभागामध्ये दहा, पश्चिम विभागात आठ, पंचवटी विभागात १५, नाशिक रोड विभागात नऊ, सिडको व सातपूर विभागात प्रत्येकी आठ, असे पीक- अप पॉइंट निश्चित करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray Full Speech : मराठी, मुंबई, महाराष्ट्र अन् बाळासाहेब ठाकरेंचा किस्सा : राज ठाकरेंचं 25 मिनिटांचं प्रचंड आक्रमक भाषण

Raj Thackeray : ''ठाकरेंची मुलं इंग्रजी मिडियम शिकतात'' म्हणणाऱ्या फडणवीसांना राज ठाकरेंनी सुनावलं; म्हणाले, ''मी हिब्रूत शिकेन पण...''

Latest Maharashtra News Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

SCROLL FOR NEXT