grapes esakal
नाशिक

ढगाळ हवामानाने द्राक्षनगरी हबकली | Nashik

माणिक देसाई

निफाड (जि. नाशिक) : आधीच दोन वर्षांपासून निफाड तालुक्यातील शेतकरी कोरोना (Corona) संकटाशी दोन हात करीत असतानाच बदलते नैसर्गिक वातावरण शेती आणि शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. कधी थंडी, तर कधी ढगाळ हवामान, पावसामुळे द्राक्ष बागायतदार मेटाकुटीस येत आहेत. मंगळवारी (ता. ३०) सकाळपासून ढगाळ हवामान तयार झाल्याने द्राक्ष बागायतदार हबकले आहेत.

औषधांच्या फवारणीच्या खर्चात दीडपट वाढ

निफाड तालुक्यातील जवळपास २५ हजार हेक्टर क्षेत्रावर सध्या द्राक्षबागांची मशागत व पोषक अन्नद्रव्य देण्याबरोबरच रोगप्रतिबंधासाठी औषधांची फवारणी केली जात आहे. अशातच द्राक्षांवर फवारणी औषधांच्या किमतीत दीडपट वाढ झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यातच हवामान बदलाने द्राक्षबागांवर रोगराईचा प्रादूर्भाव अन्‌ उत्पादनावर परिणामाची शक्यता व्यक्त होत आहे. कोवळ्या फुटींवरील द्राक्षमालावर डाऊणी, तसेच मणी धरत असलेल्या द्राक्षमालाला‌ भुरी या बुरशीजन्य रोगांसाठी ढगाळ हवामान पोषक आहे. त्यावर प्रतिबंधात्मक बुरशीनाशक औषधांची फवारणी केली जात आहे. पाऊस झाला, तर फुलोरा अवस्थेतील द्राक्षमालाची घडकुज व मणीगळ होणार आहे.

''काही दिवसापासून बदलत्या नैसर्गिक वातावरणामुळे निफाड तालुक्यातील द्राक्ष शेती संकटांचा मुकाबला करीत आहेत. द्राक्ष शेतीचा हंगाम भरात आला असताना, बदलते वातावरण शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा आहे. मात्र, अशाही परिस्थितीत योग्य नियोजन करत आम्ही द्राक्षबागा वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहोत.'' - बाबूराव सानप, द्राक्ष उत्पादक शेतकरी, सोनेवाडी बुद्रुक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BAN vs AUS: दिल्लीत जन्म, पंजाबमध्ये गिरवले क्रिकेटचे धडे अन् आता थेट ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण... कोण आहे Nikhil Chaudhary?

विदर्भातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास होणार आरामदायी, 'या' एक्सप्रेसमध्ये लागणार LHB कोच, रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय

'हे फक्त आमिरच करू शकतो!' एकाच कारमध्ये दोन सवती आणि होणारी तिसरी बायको! व्हिडिओ पाहून चकित व्हाल

Ramdara Mandir: भाविकांसाठी महत्त्वाची सूचना! रामदरा मंदिर १८ जुलैपर्यंत बंद; गर्भगृहाच्या नूतनीकरणासाठी मोठा निर्णय

Kolhapur Water Crisis : कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' 10 नद्यांवर पुन्हा उपसाबंदी लागू; पाटबंधारे विभागाचा मोठा निर्णय, शेती पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

SCROLL FOR NEXT