नाशिक : महाराष्ट्र पोलिस अकादमीतील प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकांचा सामूहिक नृत्याचा प्रकार नियम धाब्यावर बसविणारा असून, भावी अधिकाऱ्यांच्या नृत्याची चौकशी करून कारवाई व्हावी, अशी मागणी करतानाच नाशिक कोरोनाचे हॉटस्पॉट बनले असताना कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला.
दरेकर यांनी नाशिक जिल्ह्याचा दौरा केला. त्यानंतर सायंकाळी पत्रकारांशी बोलत होते. आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, ॲड. राहुल आहेर, लक्ष्मण सावजी, गिरीश पालवे आदी उपस्थित होते.
दरेकर म्हणाले, की लॉकडाउनचा दम देऊन उपयोग होणार नाही. सुवर्णमध्य काढावा लागेल. लॉकडाउन फक्त जिथे करण्याची आवश्यकता तिथे करा. सरसकट लॉकडाउन, सरसकट संचारबंदी लावू नये. पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना कुणी मोठं केलं, असा प्रश्न उपस्थित करीत ते म्हणाले, की राज्यकर्त्यांकडून कार्यवाहीची अपेक्षा; मात्र दुर्दैवाने ते मागणी आणि आरोप करतायत. आम्ही पोलिसांवर बोललो तर आम्ही पोलिसांची बदनामी करतोय असा आरोप होतो, असे म्हणत त्यांनी मागच्या काही दिवसांत राऊत शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी आणि शरद पवार यांचीचं काळजी वाहण्याचं काम करतायत, असाही चिमटा काढला.
दोषीं अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी
वनाधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, सर्व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, महिला अधिकाऱ्यांवर अन्याय होणार नाही, त्रास होणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे. जुलमी पद्धतीने कामकाज करता येणार नाही. लॉकडाउन, संचारबंदी आम्हाला हवंय; मात्र तुम्हाला आलेला झटका म्हणजे नियम असं करू नका. लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न, व्यवहार ठप्प होतात. त्या मुळे लॉकडाउन, संचारबंदी लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे. तुम्हाला वाटलं एसीमध्ये बसून जीआर काढला असं होता कामा नये, अशीही मागणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.