Doctor
Doctor 
नाशिक

दिलासादायक : आयएमएच्या डॉक्‍टरांची येथे विनामूल्य सेवा

सकाळवृत्तसेवा

नाशिक :  आयएमएच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ. समीर चंद्रात्रे  म्हणाले, की आयएमएच्या विनामूल्य सेवेची सुरवात माझ्यापासून करण्यात आली आहे. जिल्हा सरकारी रुग्णालयात दैनंदिन चार तज्ज्ञ डॉक्‍टरांची सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यांपैकी एक डॉक्‍टर बाह्यरुग्ण विभागाची सेवा देताहेत. एक डॉक्‍टर दाखल रुग्णांची तपासणी करताहेत. अन्य दोन डॉक्‍टर ऑन कॉल अंतर्गत अत्यावश्‍यक सेवेसाठी उपलब्ध असतात. त्याचप्रमाणे महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याशी चर्चा झाली असून, बिटको रुग्णालयासाठी फिजिशियन डॉक्‍टरांची सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. 

सिव्हिल आणि बिटकोत  नॉनकोविडसाठी विनामूल्य सेवा 

मोठ्या मल्टिस्पेशालिटी कॉर्पोरेट रुग्णालयाकडून आकारल्या जाणारी अनामत रक्कम आणि बिलाशी डॉक्‍टरांचा संबंध असत नाही. कोणत्याही छोट्या रुग्णालयात कोरोनाचे रुग्ण अलगीकरण अथवा आंतररुग्ण म्हणून दाखल नाहीत. त्याचप्रमाणे एन95 मास्कची किंमत 70 रुपयांवरून 400 रुपयांपर्यंत गेली आहे. 

त्यांचे दर सरकार ठरवते.... डॉक्टर नाही 

सॅनिटायझर, ग्लोव्हज, ब्लीचिंग पावडरचे दर तीनशे टक्‍क्‍यांनी वाढले आहेत. आठ ते दहा खाटांच्या अतिदक्षता विभागात सहा तासांच्या चार ड्यूटी व प्रत्येक ड्यूटीत तीन ते चार परिचारिका, दोन वॉर्डबॉय, दोन ते तीन आया, दोन असिस्टंट डॉक्‍टर, दोन कन्सल्टंट असे एकूण 24 तासांत 40 ते 50 पीपीई किट आणि शंभर ते दोनशे ग्लोव्हज लागतात. स्पेशालिटी डॉक्‍टर, पॅथॉलॉजिस्ट टेक्‍निशियनचे दहा ते वीस ग्लोव्हज वेगळे. याव्यतिरिक्त ग्रे व ग्रीन झोनमध्ये पीपीई किट घालावे लागतात. या सर्व गोष्टींचे भाव डॉक्‍टर अथवा रुग्णालय नव्हे, तर सरकार ठरवते, असेही डॉ. चंद्रात्रे यांनी म्हटले आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT