नाशिक

प्रत्येक गावाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचा संकल्प

CD
NSK26H35030 नंदुरबार : मौजे धुरखेडा येथे समाजमंदिर बांधकामाचे भूमिपूजन करताना डॉ. सुप्रिया गावित. शेजारी डॉ. हीना गावित, हेमलता शितोळे. --- गावविकासाला कायम प्राधान्य डॉ. हीना गावित ः रस्त्याचे उद्‍घाटन, समाजमंदिराचे भूमिपूजन सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. १५ : माजी मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी मंजुरी मिळवून दिलेल्या शहादा तालुक्यातील विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्‍घाटन माजी खासदार डॉ. हीना गावित व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या हस्ते करण्यात आले. यात शहादा तालुक्यातील प्रकाशा-धूरखेडा-भादे येथील लहान पूल व रस्त्याचे उद्‍घाटन करण्यात आले. तसेच धूरखेडा येथील समाजमंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी सभापती हेमलता शितोळे- पाटील, गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ व नागरिक उपस्थित होते. दरम्यान, याप्रसंगी ग्रामस्थांना उद्देशून केलेल्या भाषणात डॉ. हीना गावित यांनी सांगितले, की माजी मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी त्यांच्या कार्यामध्ये कायमच ग्रामीण विकासाला प्राधान्य दिले. प्रत्येक गावाचा विकास व्हावा, या दृष्टीने माझ्या खासदारकीच्या काळातदेखील सदैव प्राधान्य दिले. अनेक गावांना विकासाच्या प्रमुख प्रवाहात आणता आले. यापुढेही गावांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य दिले जाईल. डॉ. सुप्रिया यांनीदेखील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण पाणी, वीज, रस्ते याबरोबरच अन्य विकासकामांना महत्त्व दिले. ग्रामीण लोकांचे जीवन सहज सोपे करण्यासाठी ग्रामीण भागातील समस्यांचे निराकरण व ग्रामविकास हाच आमच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bird Photography: डॉक्टरची निसर्गाशी अनोखी मैत्री! ऋषी गाडगे यांच्या छायाचित्रांतून उलगडले पक्ष्यांचे विश्व

दुर्गम भागातील मुलांसाठी शिक्षकाने उचललं मोठं पाऊल; 'सिनेमॅन'ची हटके कथा पोहोचली थेट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये!

तरुणीला भररस्त्यात अडवलं, शरीरावर सपासप वार केले अन्..., एकतर्फी प्रेमातून तरुणाचं क्रूर कृत्य; अंबरनाथमध्ये खळबळ

Latest Marathi News Live Update : विहिरीच्या मोजणीसाठी उतरले अन् काळाने घात केला; मातीचा ढिगारा कोसळून चार मजुरांचा दुर्दैवी मृत्यू, आंबे गावावर शोककळा

Rajuri leopard cub : राजुरीत ऊसतोड सुरू असताना बिबट्याचा आठ दिवसांचा बछडा आढळला; शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीती

SCROLL FOR NEXT