नाशिक

ढोलताशांचा खर्च टाळून

CD
ॲंकर NSK26H34972 पाळधी खुर्द : नागरिकांना पाण्याचे जारचे वाटप करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील आदी. --------- ढोलताशांचा खर्च टाळून ४०० कुटुंबांना जार वाटप पाळधी खुर्द येथे त्रिनेत्र दुर्गोत्सव मंडळ, जीपीएस मित्र परिवाराचा उपक्रम सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १३ : उत्सवाचा खरा आनंद केवळ जल्लोषात नसून समाजाच्या अडचणीच्या काळात मदतीला धावून जाण्यात आहे. याच भावनेतून पाळधी खुर्द येथील त्रिनेत्र दुर्गोत्सव मंडळ व जीपीएस मित्र परिवाराने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर स्तुत्य उपक्रम राबविला. दुर्गोत्सवाच्या मिरवणुकीत डीजे, बँड व ढोलताशांवर होणारा खर्च टाळून त्या रकमेतून प्रभाग क्रमांक ४ मधील ४०० कुटुंबांना प्रत्येकी एक पाण्याचा जार वाटप करण्यात आला. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सामाजिक उपक्रम पार पडला. पाळधी खुर्द येथील ग्रामपंचायत सदस्य सुधाकर महाजन यांच्या पुढाकाराने, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शनिनगर येथील त्रिनेत्र दुर्गोत्सव मंडळ व जीपीएस मित्र परिवाराच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. पाळधीचे सरपंच शरद कोळी, उपसरपंच दिलीप पाटील, सदस्य अनिल कासट, सुधाकर महाजन, डिगू माळी, चंदू माळी, गणेश माळी, नाना फुलपगार, सुभाष महाजन, पंकज कोळी यांच्यासह त्रिनेत्र दुर्गोत्सव मंडळ व जीपीएस मित्र परिवाराचे पदाधिकारी, कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते. चौकट हीच खरी सामाजिक बांधिलकी : पालकमंत्री पालकमंत्री पाटील म्हणाले की, दुष्काळाच्या काळात नागरिकांची गरज ओळखून उत्सवाचा खर्च समाजहितासाठी वापरणे, हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे. त्रिनेत्र दुर्गोत्सव मंडळ व जीपीएस मित्र परिवाराने समाजापुढे आदर्श निर्माण केला असून, इतर मंडळांनीही अशा विधायक उपक्रमांचा आदर्श घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JEE Advanced 2027 ची तारीख जाहीर; 23 मे रोजी होणार परीक्षा, IIT दिल्लीकडे आयोजनाची जबाबदारी

रेल्वे प्रवासात बदल! आता ट्रेनमधील RAC सुविधा बंद होणार? रेल्वे प्रशासन मोठा निर्णय घेणार

Latest Marathi News Live Update: दूध विक्रीच्या दरामध्ये मोठी वाढ, प्रति लिटर ४ रुपयांनी महागले

Ramayana Box Office : अवघ्या ८ दिवसांत बॉक्स ऑफिसवर इतिहास! 'रामायण'ची १००० कोटींच्या क्लबमध्ये दणदणीत एन्ट्री; आतापर्यंतच्या सर्व चित्रपटांची यादी पाहा!

Touch Wood Tradition: 'टच वुड' म्हणताच लाकडाला हात का लावतात? जाणून घ्या यामागचं रंजक कारण

SCROLL FOR NEXT