संकलित मूल्यांकन चाचणी
डिसेंबरच्या पहिल्या सप्ताहात
सुधारीत वेळापत्रक ः २ ते ५ डिसेंबर दरम्यान आयोजन
सकाळ वृत्तसेवा
इगतपुरी, ता.१५ : दिवाळीची सुट्टी संपताच नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात होणारी संकलित मूल्यांकन चाचणी (पॅट) आता डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात घेण्यात येणार आहे. मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी संघटनांकडून विरोध झाल्यानंतर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे आता दिवाळीच्या सुटीनंतर लगेच परीक्षेचा ताण येण्याऐवजी विद्यार्थ्यांना तयारीसाठी काही दिवस मिळणार आहेत.
एससीईआरटीच्या सुधारित वेळापत्रकानुसार, प्रथम भाषेची चाचणी २ डिसेंबर, गणिताची ३ डिसेंबर आणि तृतीय भाषेची चाचणी ५ डिसेंबरला होणार आहे. ही परीक्षा दहा माध्यमांमध्ये घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील उणिवा ओळखून अध्यापन प्रक्रियेत सुधारणा करणे, हा या चाचणीचा मुख्य उद्देश आहे. प्रथम सत्रातील अभ्यासक्रम, अध्ययन निष्पत्ती आणि मूलभूत क्षमतांवर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत. अध्ययनात मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष उपाययोजना आखण्यावरही भर दिला जाणार आहे.
----------------------
कोट
संकलित चाचणीच्या प्रश्नपत्रिका एससीईआरटी पुणे यांच्यामार्फत विद्यार्थीनिहाय उपलब्ध करून देण्यात येणार असून प्रत्येक शाळेने प्रश्नपत्रिकांची गोपनीयता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत याबाबत सक्त निर्देश दिले आहेत.
- सरोज जगताप, शिक्षणाधिकारी, जि. प. नाशिक
--------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.