takli STP Center esakal
नाशिक

गटारी गोदावरीत सोडल्या तर चालेल पण लोकांनी मूर्ती नाही टाकायच्या?

विनोद बेदरकर

नाशिक : नाशिक महापालिकेने यंदा महापालिका स्वतःच प्रक्रियेविना गोदावरीत सांडपाणी सोडते त्या टाकळी मलनिस्सारण केंद्राजवळ गणेश मूर्ती संकलनाची सक्ती केली होती. स्वतःचे हजारो गॅलन लिटर सांडपाणी स्वतःच प्रक्रियेविना गोदावरीत सोडायचे आणि नाशिककर नागरिकांना मात्र मूर्ती विसर्जनाऐवजी सक्तीने मूर्ती संकलन करायचे असा नाशिककरांना प्रदूषण मुक्तीचे ज्ञान आणि स्वतः मात्र कोरडी पाषाण असा उरफाटा प्रकार टाकळी एसटीपी केंद्राजवळ पहायला मिळाला. (Compulsory donation system by NMC of ganesha idol near Takli STP center Nashik News)

प्रक्रियेविना शहरातील सर्वाधिक प्रदूषित सांडपाणी गोदावरीत सोडले आहे, त्याच टाकळी मलनिस्सारण केंद्राशेजारी यंदा नाशिक महापालिकेने गणेश मूर्ती विसर्जनाची सोय केली होती मात्र त्या ठिकाणी मूर्ती विसर्जनाला मात्र अजिबात परवानगी दिली जात नव्हती.

लोकांना गोदावरीचे प्रदूषण टाळण्यासाठी मूर्ती संकलनाची सक्ती करण्यासाठी खास पोलिसही नेमले होते.प्रसंगी महापालिका कर्मचारी मंडपात बसून पोलिसांना पुढे करीत लाठ्यांच्या दंडुक्याच्या बळावर मूर्ती संकलनाची मोहीम राबवित होते, त्यातून दिवसभर पोलीस आणि नागरिकांत वादही होत होते.

गोदावरीचे प्रदूषण टाळण्यासाठी नाशिककर नागरिकांना गणेश मूर्ती विसर्जनाला सक्तीने प्रतिबंध करणाऱ्या महापालिकेचे गोडावरी विषयीचे पुतना प्रेम वेळोवेळी उघडकीस आले आहे, निरी आणि उच्च न्यायालयात वेळोवेळी मालपालिकेचे पितळ उघडे पडले आहे.

मागील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दरम्यान याच टाकली पुलावर हिरवे बारदान लावून प्रक्रियेविना सांडपाणी सोडणारा एसटीपी प्रकल्प महापालिकेला झाकून ठेवावा लागला होता, मात्र आता सिहस्थ कुंभमेळ्याला आठ वर्षे होऊनही टाकली मलनिस्सारण केंद्राची दुरवस्था कायम आहे उलट अशा सर्वाधिक प्रदूषण होणाऱ्या टाकळी एसटीपी केंद्रावर सक्तीच्या उपक्रमातून महापालिकेचा नागरिकांच्या आरोग्याशी उघड उघड खेळ सुरू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : एकनाथ शिंदेची शिवसेना कोल्हापुरात स्वबळावर लढणार का? कार्यकर्त्या बैठकीत काय झाला निर्णय

Women's World Cup : हर्लीन देओलचा प्रश्न अन् लाजले पंतप्रधान नरेंद्र मोदी; वर्ल्ड कप विजेत्या पोरींना आवरेना हसू Video Viral

Suraj Wife: ही आहे सुरज चव्हाणची होणारी बायको! अंकिताने खास पद्धतीने दोघांचं केलं केळवण, सुरजचा उखाणा एकदा ऐका! Viral Video

Vayuputhra : हे आहे 'वायुपुत्र'! भारताचं पहिलं इलेक्ट्रिक रॉकेट; कितीहीवेळा करा चार्जिंग, लवकरच स्पेसमध्ये जाणारा हा चमत्कार एकदा बघाच

Pune Car Accident : पुण्यात आणखी एक भीषण अपघात ! पौड रस्त्यावर मेट्रो पिलरला कार धडकली अन्...

SCROLL FOR NEXT