15.jpeg
15.jpeg 
नाशिक

विवाह सोहळ्यालाही आली रंगत..! देश-विदेशातील नातलगांनी साधला व्हॉटसऍपवरून  मुहूर्त

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सध्या चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरू आहे. एप्रिल-मे महिना म्हटला की सुट्टी आणि लग्नसराईचा काळ. मात्र कोरोनामुळे उद्‌भवलेल्या लॉकडाऊनमुळे या साऱ्यावर पाणी फिरले आहे. अनेकांनी आपले विवाहसोहळे रद्द केले आहेत. तर काहींनी अशाही विपरित परिस्थितीमध्ये लॉकडाऊनची बंधने पाळत विवाहाचे सनई-चौघडे वाजविले.अश्याच एका नवदाम्पत्याचा विवाह गंगापूर रोड येथील गार्डन प्लाझा बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये पार पडला. ऍड. अनुराग पटवर्धन आणि शिक्षिका मोनलिसा बुरकुले यांचा हा विवाह मोजक्‍या 25 ते 30 वऱ्हाडींच्या उपस्थित झाला.

देश-विदेशातील नातलगांची हजेरी

ऍड. अनुराग पटवर्धन आणि शिक्षिका मोनलिसा बुरकुले यांचा हा विवाह मोजक्‍या 25 ते 30 वऱ्हाडींच्या उपस्थित झाला. या विवाह सोहळ्यासाठी देश-विदेशातील नातलगांना हजेरी लावावयाची होती. परंतु कोरोनामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीमुळे शक्‍य झाले नाही. असे असले तरीही या नातलगांनी नवदाम्पत्याला शुभाशीर्वाद देण्यासाठी व्हाट्‌सअप या सोशल मीडियाच्या व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून विवाह सोहळ्याला हजेरी लावत आशीर्वाद दिले. विवाह सोहळ्यात नवदाम्पत्यासह उपस्थित वऱ्हाडींनी मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत आणि सॅनिटायझरचा वापरही केला. एकूणच बंधने असली तरीही विवाह सोहळा अधिक रंजक आणि उत्साहात पार पडल्याचे समाधान नवदाम्पत्याच्या चेहऱ्यावर झळकत होते. 

व्हॉटसऍपवरून मुहूर्त साधला

कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्येही विवाहाचे सनई-चौघडे वाजत आहेत. परंतु याचीही एक नवलाई आहे. गंगापूर रोड परिसरातील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये रितसर विवाह होऊन या नवदाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी देश-विदेशातील नातलगांनीही व्हॉटसऍपवरून मुहूर्त साधला आणि व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून शुभाशीर्वाद दिले. त्यामुळे नवदाम्पत्याच्या विवाह सोहळ्यालाही रंगत आली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT