congratulating Ashok Saraf from Chhagan Bhujbal recalled memories of acting nashik news
congratulating Ashok Saraf from Chhagan Bhujbal recalled memories of acting nashik news esakal
नाशिक

Ashok Saraf : मामांनी साधले विनोदाचे टायमिंग; भुजबळ यांच्याकडून एकत्र केलेल्या कामांच्या आठवणींना उजाळा

सकाळ वृत्तसेवा

Chhagan Bhujbal : मराठी अभिनय सृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण हा मानाचा पुरस्कार जाहीर केला त्यानंतर राज्याचे मंत्री, अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अशोक सराफ यांचे अभिनंदन करताना त्यांच्यासोबत केलेल्या अभिनयाच्या आठवणींना उजाळा दिला. (congratulating Ashok Saraf from Chhagan Bhujbal recalled memories of acting nashik news)

भुजबळ म्हणाले, माझे मित्र अशोक सराफ यांना राज्य सरकारकडून २०२३ चा महाराष्ट्र भूषण हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मराठी हिंदी-चित्रपट आणि नाटकांमधून त्यांनी आजवर अनेक विविधरंगी भूमिका साकारत आपल्या अप्रतिम अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले.

विनोदाच्या ‘टायमिंग’ साठी ते खूप प्रसिद्ध आहेत. चाहत्यांमध्ये ‘अशोक मामा’ म्हणून लोकप्रिय असलेले अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्याचा मलाही योग आला. सुरवातीपासूनच अभिनयाचे आकर्षण असल्याने मी सामाजिक कामाबरोबरच संधी मिळेल तेव्हा आपली अभिनयाची हौस भागविण्याचा प्रयत्न केला.

दैवत, नवरा-बायको या चित्रपटांमधून मी छोट्या भूमिका साकारल्या. विशेष म्हणजे दोन्ही चित्रपटात अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. या निमित्ताने या दिग्गज अभिनेत्याचे काम जवळून पाहता आले.

ते आजही कला क्षेत्रात सक्रिय आहेत आणि मराठी चित्रपट, नाटकांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहेत. हा पुरस्कार म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांच्या अष्टपैलू अभिनयाचा आणि कामाचा उचित सन्मान आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: डोंबिवलीत ईव्हीएम मशीन पडले बंद

IPL 2024 Playoffs : प्लेऑफसाठी नाही कोणत्या राखीव दिवस; पावसामुळे खेळखंडोबा झाला तर कसा लागणार निकाल?

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

SCROLL FOR NEXT