nashik metro hub
nashik metro hub esakal
नाशिक

मल्टी मोडल हबला मेट्रो निओची संमती

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मेट्रो रेल्वे प्रकल्प साकारताना अस्तित्वात असलेल्या रेल्वेस्थानकावरून उड्डाणपूल तयार करता येत नाही. त्यामुळे सिन्नर फाटा येथे प्रस्तावित मल्टी मोडल हबमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहेत. मेट्रो निओच्या अधिकाऱ्यांनी सिन्नर फाटा किंवा देवळाली व येथील प्रस्तावित पुलावरून मेट्रो रेल्वे मल्टी मोडल हबपर्यंत पोहोचविण्यास संमती दिल्याने मल्टी मोडल हब तयार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सिन्नर फाटा येथे महापालिकेचा आरक्षित भूखंड आहे. हा भूखंड रेल्वेला देण्याचा निर्णय यापूर्वी झाला होता. मात्र, २०१७ च्या विकास आराखड्यात पब्लिक ॲमेनिटीसाठी आरक्षण पडल्याने महापालिकेने शहर बसडेपो उभारण्याचा निर्णय घेतला. सुमारे ११ एकर जागेवर बस डेपो उभारण्याचे काम सुरू असतानाच, नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी भूसंपादन होत असल्याने डेपोच्या जागेवरून रेल्वे लाईनची अलायमेंट जात आहे.

ही जागा महारेलकडे हस्तांतरित करण्याची मागणी झाल्यानंतर महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी महापालिका व महारेल कंपनीचे नुकसान होण्याऐवजी महारेल कंपनीने ८० मीटरऐवजी अतिरिक्त जागा संपादित करून त्या जागेवर मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट हबचा प्रस्ताव महारेल कंपनीकडे दिला. मेट्रो निओ प्रकल्पही नाशिक रोडच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत पोहोचणार असल्याने नाशिककरांना एकावेळी रेल्वे, शहर बस व टायरबेस मेट्रो एकाच इमारतीत उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने तीन मजली इमारत उभारून तेथे मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट हब निर्माण करण्याचा प्रस्ताव महारेलसह महामेट्रो कंपनीसमोर ठेवण्यात आला. महारेल कंपनीने ४० एकर जागेवर हब उभारण्याचे प्राथमिक स्वरूपात मान्य केले आहे.

मेट्रो निओची मान्यता

रेल्वे शेड किंवा स्थानकावरून मेट्रोचा उड्डाणपूल साकारता येत नसल्याने मेट्रो निओ कंपनीकडून या प्रकारावर कुठलेच भाष्य झाले नाही. त्यामुळे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी ऑनलाईन बैठक आयोजित केली होती. त्यात मेट्रो निओचे टेक्निकल हेड महेश कुमार यांच्यासमोर सिन्नर फाटा येथील मल्टी मोडल हबपर्यंत मेट्रो नेण्याचे दोन मार्ग सूचविण्यात आले. त्यात सिन्नर फाटा येथून पुढे किंवा देवळालीगावातून खर्जुल मळा परिसरात जाणाया रस्त्यावर नवीन पूल महापालिकेने प्रस्तावित केला आहे. तेथून मेट्रो निओ मल्टी मोडल हबपर्यंत आणता येईल, हे दोन पर्याय सूचविण्यात आले. त्यास तत्वता मान्यता देण्यात आल्याची माहिती आयुक्त जाधव यांनी दिली.

मोडल ट्रान्स्पोर्ट हबमध्ये महत्त्वाचे

  1. महापालिका, महारेल व मेट्रो निओचा स्वतंत्र खर्च वाचणार

  2. एकाच इमारतीत तीन प्रकारच्या ट्रान्सपोर्ट सुविधा

  3. पहिल्या मजल्यावर रेल्वे, दुसऱ्याया मजल्यावर बस, तर तिसऱ्या मजल्यावर मेट्रो

  4. ट्रान्सपोर्ट हबच्या इमारतीत कमर्शिअल मॉल, थिएटर, ऑफिसेस, कार पार्किंगची सुविधा प्रत्येक मजल्यावर सरकते जिने

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma : MI चा पराभव मात्र टीम इंडियाला दिलासा! शेवट गोड लखनौनेच केला

मुलं हवीत की ‘रील स्टार’?

मानवी अस्तित्वाचा वास्तव शोध!

महिला धोरणांचा प्रवास

अनुभवात्मक शिक्षण हवेच!

SCROLL FOR NEXT