नाशिक

कोतवाल भरती परिक्षेला स्थगिती

CD
कोतवाल भरती परीक्षेला स्थगिती --- राज्य सरकारचे आदेश : उमेदवारांमध्ये धाकधूक सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १३ : जिल्हा प्रशासनामार्फत महसूल सेवकांच्या (कोतवाल) रिक्त पदांसाठी रविवारी (ता. १५) होणाऱ्या लेखी परीक्षेला सरकारने स्थगिती दिली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार १७ जानेवारीला आता परीक्षा होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. ऐनवेळी परीक्षा स्थगित झाल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील कोतवालांच्या १५६ रिक्तपदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या पदांसाठी तब्बल चार हजार ६० इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी तीन हजार ३९ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. या पात्र उमेदवारांची रविवारी लेखी परीक्षा पार पडणार होती. मात्र, तत्पूर्वीच राज्य सरकारने या परीक्षेला स्थगिती दिली. त्यासंदर्भात गुरुवारी (ता. १२) सायंकाळी उशिराने जिल्हा प्रशासनाला आदेश प्राप्त झाले. राज्यातील सहाही विभागांतील कोतवाल पदाच्या भरती प्रक्रियेला सरकारने हिरवा कंदील दिला होता. मात्र, नाशिक व कोकण वगळता उर्वरित चारही महसुली विभागांत विधान परिषद निवडणुकांमुळे भरती रखडली होती. दरम्यानच्या काळात महसूल विभागाने गट अ ते ड पदभरतीसंदर्भात राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडून अभिप्राय मागविला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नाशिक आणि कोकण विभागात आयोजित परीक्षेला राज्य सरकारने स्थगिती दिली. तसेच, सुधारित वेळापत्रकानुसार सहाही महसुली विभागांत १७ जानेवारीला लेखी परीक्षा होणार असून, १८ जानेवारीला निकाल घाेषित केले जातील. त्यामुळे कोतवाल होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या इच्छुक उमेदवारांना दोन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Rate Hike : राज्यात दूध विक्री दरात प्रतिलिटर ४ रुपयांची वाढ; १६ नोव्हेंबरपासून नवीन दर लागू

पंतप्रधान मोदींच्या नावाने ऑनलाईन फ्रॉड; एका मेसेजमुळे बँक खातं होऊ शकतं रिकामं, नेमका विषय काय?

NTA Reform: NEET मधील पेपरफुटीनंतर मोठा निर्णय; गैरप्रकार रोखण्यासाठी आता थेट लष्करी अधिकाऱ्यांना...

IND vs NZ: शेवटच्या वनडेत खेळणार नाही मॅट हेन्री, विराट कोहलीने जर्सी भेटही दिली; पण कारण काय?

Latest Marathi News Live Update: दिल्लीत सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या महत्त्वाच्या बैठका

SCROLL FOR NEXT