corona updates nashik esakal
नाशिक

नाशिक जिल्‍ह्‍यात आज ६५ कोरोना रूग्णांची नोंद

अरूण मलाणी

नाशिक : जिल्‍ह्‍यात नव्‍याने आढळणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात असल्‍याने शहरासाठी ही दिलासादायक बाब आहे. बुधवारी (ता.२५) जिल्‍ह्‍यात ६५ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. तर ६२ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. एका बाधिताचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला.

सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्‍यात ९३७ बाधितांवर उपचार सुरु आहेत. बुधवारी नाशिक महापालिका क्षेत्रात २२, नाशिक ग्रामीण क्षेत्रात ३९ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. जिल्‍हा बाहेरील चौघांना कोरोनाची लागण झाली असून, सलग दुसऱ्या दिवशी मालेगावमध्ये एकही कोरोना रुग्‍ण आढळला नसल्‍याची नोंद आहे. ६२ रुग्‍णांनी दिवसभरात कोरोनावर मात केली. एका बाधिताचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला असून, हा मृत नाशिक ग्रामीण क्षेत्रातील आहे.

७०१ रुग्‍ण नाशिक महापालिका क्षेत्रातील

सायंकाळी उशीरापर्यंत ६९९ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यात नाशिक ग्रामीणमधील ३७१, नाशिक शहरातील १८८, मालेगावच्‍या १४० रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ७२० रुग्‍ण दाखल झाले. यापैकी ७०१ रुग्‍ण नाशिक महापालिका क्षेत्रातील आहेत. जिल्‍हा रुग्‍णालयात व डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात प्रत्‍येकी तीन रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमधील अकरा, मालेगावच्‍या दोघा रुग्‍णांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs PBKS Weather: 'कालबैसाखी’ने नाइट रायडर्सचे टेंशन वाढवले; कोलकाताहून Live अपडेट्स, कट ऑफ टाईम अन् नियम Explain

'धनंजय माने...' नाटकानंतर बऱ्याच वर्षांनी प्रिया बेर्डेंचा रंगभूमीवर दमदार कमबॅक ! या दिवशी होणार शुभारंभ

IPL 2026 तिकिट खरेदी करताय, सावध व्हा! २५ वर्षीय युवकाने आईच्या अकाऊंटमधून RCB vs CSK मॅच तिकीटासाठी लाखो रुपये पाठवले अन्...

Mumbai News : मध्य-पूर्वेतील युद्धाचे सावट; मुंबई–विजयदुर्ग रोरो सेवेला ग्रहण, सेवा किमान महिनाभर ठप्प

Latest Marathi News Live Update: अजूनही निवडणूक बिनविरोध होऊ शकते- चंद्रकांत पाटील

SCROLL FOR NEXT