Corona sakal
नाशिक

नाशिक जिल्ह्यात ७२५ बाधितांवर उपचार सुरु

अरुण मलाणी

नाशिक : कोरोना प्रादुर्भावाच्‍या वाढीच्‍या दृष्टीने ग्रामीण भाग संवेदनशील ठरत आहे. बुधवारी (ता.२७) जिल्‍ह्यात ६४ रुग्‍णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले असून, यापैकी ३३ बाधित हे नाशिक ग्रामीण भागातील आहेत. दरम्‍यान ७३ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. एका बाधिताचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्यात ७२५ बाधितांवर उपचार सुरु आहेत.

बुधवारी नाशिक महापालिका क्षेत्रात २६ तर नाशिक ग्रामीणमध्ये ३३ रुग्‍णांना कोरोनाची लागण झाल्‍याचे निदान झाले. मालेगाव महापालिका क्षेत्रात दोन तर जिल्‍हा बाहेरील तिघांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. गेल्‍या दोन दिवसांपासून जिल्‍ह्यातील मृतांचा आकडा वाढला होता. त्‍यातच बुधवारी एका बाधिताच्‍या मृत्‍यूची नोंद असून, मृत हा नाशिक ग्रामीण क्षेत्रातील आहे.
सायंकाळी उशीरापर्यंत ७६१ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. यापैकी नाशिक ग्रामीणच्‍या ४९०, मालेगावच्‍या १४९ तर नाशिक शहरातील १२२ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ३७४ रुग्‍ण दाखल झाले. यापैकी ३६५ रुग्‍ण हे नाशिक महापालिका क्षेत्रातील होते. जिल्‍हा रुग्‍णालयात एक रुग्‍ण दाखल झाला. नाशिक ग्रामीणमधील आठ रुग्‍णांचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! कोणते शेअर्स वाढले?

MPSC Success Story: वीटभट्टी कामगाराच्या मुलाची जिद्दीने यशाला गवसणी; एमपीएससी परीक्षेतून बनला कृषी उपसंचालक, आई-वडीलांनी उपाशी राहून दिलं शिक्षण!

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! पाठ्यपुस्तकांबरोबर आता दफ्तरही मिळणार मोफत; ४२ लाख विद्यार्थ्यांना होणार फायदा

Latest Marathi News Update: बिल गेट्स यांचे आंध्र प्रदेशातील गन्नवरम विमानतळावर आगमन

Kolhapur Crime : आठ दिवस भीतीत, सोने विकल्यानंतर बिनधास्त; अखेर पंचवीस दिवसांनी संशयित पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT