coronavirus esakal
नाशिक

Corona Updates | नाशिक जिल्‍ह्‍यात ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत घट

अरूण मलाणी

नाशिक : जिल्‍ह्‍यात उपचार घेणाऱ्या कोरोना (Corona) बाधितांच्‍या संख्येत घट होत असून, ही जिल्‍हावासीयांसाठी दिलासादायक बाब आहे. गुरुवारी (ता. ९) जिल्‍ह्‍यात ३२ रुग्‍णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. तर ५३ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. दोन बाधितांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत २३ ने घट झाली असून, सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्‍यात ३४६ बाधित उपचार घेत आहेत.

जिल्‍ह्‍यात कोरोनाच्‍या प्रादुर्भावात नाशिक महापालिका क्षेत्र पुन्‍हा केंद्रस्‍थानी आले आहे. गुरुवारी आढळलेल्‍या ३२ कोरोना बाधितांपैकी २२ बाधित हे नाशिक महापालिका क्षेत्रातील आहेत. उर्वरित दहा बाधित नाशिक ग्रामीण क्षेत्रातील आहेत. मालेगाव महापालिका क्षेत्रात दिवसभरात नव्‍याने बाधित आढळून आला नाही. दरम्‍यान दोन बाधितांच्‍या मृत्‍यूची नोंद असून, दोन्‍ही मृत हे नाशिक ग्रामीण क्षेत्रातील आहेत.

प्रलंबित अहवालांची संख्या वाढत चालली आहे. सायंकाळी उशीरापर्यंत दोन हजार ८४३ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यापैकी सर्वाधिक दोन हजार ४५८ प्रलंबित अहवाल नाशिक ग्रामीण क्षेत्रातील होते. मालेगावच्‍या २२३, तर नाशिक शहरातील १६२ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ५३० रुग्‍ण दाखल झाले. यापैकी ५२८ रुग्‍ण नाशिक महापालिका क्षेत्रातील होते. जिल्‍हा रुग्‍णालयात व डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात प्रत्‍येकी एक रुग्‍ण दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: नोटिसा अन् चौकशा सुरू... आता मनोज जरांगे काय करणार? मुंबईबाबत घेतला मोठा निर्णय, बावनकुळेंना नेमकं काय म्हणाले?

गणरायाच्या आगमनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला! कोकणात जाताना कारचा अपघात; एकाचा मृत्यू, 4 जण जखमी

Ganesh Chaturthi Do's & Don'ts: गणपती बाप्पांना घरी आणताय? मूर्ती निवडण्यापासून स्थापनेपर्यंत ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : तिसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडीचा फटका; माणगाव-इंदापूर परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा

Mumbai News: गणेशोत्सवाची आठवडाभर सुट्टी; मात्र गुजराती, कॉन्व्हेंट शाळांचा सुट्टी देण्यास नकार, शिक्षण विभागाचे कारवाईचे संकेत

SCROLL FOR NEXT