corona vaccination corona vaccination
नाशिक

नाशिक जिल्‍ह्यात कोरोना लसीकरणाचा 18 लाखांचा टप्पा पार

अरुण मलाणी


नाशिक : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची गती वाढू लागली आहे. मंगळवारी (ता. २७) जिल्‍ह्यात ३० हजार ९३६ नागरिकांचे लसीकरण झाले. यातून आतापर्यंत जिल्‍ह्यात लसीकरण झालेल्‍या नागरिकांच्या संख्येने १८ लाखांचा आकडा ओलांडला आहे. (corona vaccination crosses 18 lakh mark in Nashik district)


राज्‍याप्रमाणे जिल्‍ह्यात कोरोनाची दुसरी लाट आली. जुलै महिन्‍यात कोरोना प्रादुर्भाव काहीसा नियंत्रणात आला आहे. असे असताना संभाव्‍य तिसऱ्या लाटेच्‍या पार्श्वभूमीवर नागरिक लसीकरणाला सकारात्‍मक प्रतिसाद देत आहेत. मंगळवारी जिल्‍ह्यात ३० हजार ९३६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यासोबत जिल्‍ह्यात लसीकरण करून घेतलेल्‍या नागरिकांची संख्या १८ लाखांहून अधिक झाली आहे.

आतापर्यंत १८ लाख १३ हजार ४०२ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यापैकी १३ लाख ६३ हजार ४१८ नागरिकांनी लशीचा पहिला डोस घेतला आहे, तर चार लाख ४९ हजार ९८४ नागरिकांनी लशीचे दोन्‍ही डोस घेतले आहेत. आगामी काळात लसीकरण मोहिमेला आणखी गती दिली जाणार असून, रोज ५० हजार नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट जिल्‍हा प्रशासनाने ठेवले आहे. यापूर्वी एका दिवशी ४० हजारांपर्यंत लसीकरण करण्यात आले होते. मात्र, लशीच्‍या उपलब्‍धतेमुळे लसीकरण मोहिमेची गती प्रभावित होत आहे.

(corona vaccination crosses 18 lakh mark in Nashik district)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

Pune Drone Cluster: पुण्यात ड्रोन अन् खाद्यप्रक्रिया क्लस्टर; राज्यातील पहिलाच उपक्रम, भोसरी, हडपसरमध्ये सुरू होणार प्रकल्प!

Pandharpur News: पंढरपुरातील प्रस्तावित कॉरिडॉरला तीव्र विरोध; सुब्रह्मण्यम स्वामींच्या मोहिमेस पाठिंबा देण्यासाठी बाधितांचा शंखनाद!

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Solapur News: भारताच्या दणदणीत विजयानंतर सोलापुरात जल्लोष; पाकिस्‍तानला लाेळविताच आतषबाजी, पेढे वाटून, तिरंगा उंचावून आनंदोत्सव साजरा!

SCROLL FOR NEXT