tirupati balaji esakal
नाशिक

Nashik : आजी-माजी नगरसेवकांसह इच्छुकांची पसंती बालाजीला

विक्रांत मते

नाशिक : महापालिका (NMC) व जिल्हा परिषद निवडणुकीच्या (ZP Elections) पार्श्‍वभूमीवर राजकीय व आर्थिक यश पदरात टाकणाऱ्या श्री. तिरुपती बालाजीचे (Tirupati Balaji) दर्शन घेण्याकडे आजी-माजी नगरसेवक (Corporators), जिल्हा परिषद सदस्यांसह नव्याने निवडणुकीच्या मैदानात उतरणाऱ्या इच्छुकांचा कल असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत महापालिकेच्या पन्नासहून माजी नगरसेवकांनी तिरुपती वारी पार पाडली आहे. तर, जून महिन्यात कार्यकर्त्यांसह बालाजीच्या दर्शनाला जाण्याची तयारी अनेकांनी केली आहे. बालाजी कोणाला पावतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (corporators with workers Aspiring candidates visiting tirupati balaji temple before elections Nashik Political News)

आंध्र प्रदेशातील श्री. तिरुपती बालाजी देवस्थान मनातील इच्छापूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे राजकीय व आर्थिक इच्छा पूर्ण करण्यासाठी अनेकांचा ओढा श्री. बालाजी मंदिराकडे आहे. महापालिका निवडणुकांची तारीख लांबल्याने अनेकांनी बालाजीला प्रसन्न करण्यासाठी उन्हाळ्यात तिरुपती डोंगराकडे प्रस्थान केले. अशीच परिस्थिती ग्रामिण भागातदेखील दिसून आली. नाशिक महापालिकेतील पन्नासहून अधिक माजी नगरसेवकांनी कुटुंबांसह बालाजीला निवडून आणण्याचे साकडे घातले. आजी- माजी नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनादेखील तिरुपती वारी घडवून आणण्यात आली.

पंचवटीतील पंधरा नगरसेवकांनी बालाजीचे दर्शन घेतले. नाशिक रोड विभागात पाच नगरसेवक कुटुंबांसह बालाजीच्या दर्शनाला जाऊन आले. सिडको, सातपूर विभागात माजी नगरसेवकांसह इच्छुकांनी तिरुपतीचे दर्शन घेतल्याची माहिती समोर येत आहे. पंचवटीत व जुने नाशिकमधील दोन नगरसेवकांनी कार्यकर्त्यांसाठी प्रत्येकी एक बोगी बुक करून दर्शन घडविले. महापालिकेसह जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माजी सदस्यांनी तिरुपतीचे दर्शन घेत निवडणुकीचा नारळ फोडल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

Red Fort Flag Hoisting: भारताच्या 'या' दोन पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर तिरंगाच फडकावला नव्हता; काय आहे इतिहास?

IPL: हार्दिक पंड्याला KKRची खुली ऑफर? माजी खेळाडू म्हणाला, ‘या’ संघात मिळेल नेतृत्वाची जबाबदारी; IPL 2027 आधी मोठ्या ट्रेडची चर्चा

Marathi News Live Updates : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

SCROLL FOR NEXT