Tree
Tree esakal
नाशिक

Nashik News : सावधान! झाडांना इजा केल्यास गुन्हा दाखल होणार?

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : झाडांना खिळे ठोकणे, विद्युत रोषणाई करण्यासह इजा करीत विद्रूपीकरण केल्यास यापुढे गुन्हे दाखल होणार आहे. (Crimes will be registered if trees are damaged by nailing electric lighting nashik news)

महापालिकेने उद्यान निरीक्षकांना तसे अधिकार दिले आहेत. झाडांना इजा केल्याचे काही प्रकार शहरात उघडकीस आल्यानंतर महापालिकेने या कारवाया सुरू केल्या आहेत. शहरात झाडांवर खिळे ठोकून जाहिरातीचे माहितीपत्रक लावणे व विद्युत रोषणाई करून जाहिरात केल्याप्रकरणी महापालिका उद्यान विभागाने एक एजन्सी, चार नामांकित हॉटेल व क्रोमा शोरूमवर गुन्हा दाखल केला आहे.

संबंधितांकडून नियमानुसार कारवाई करून आर्थिक दंड वसूल केला जाणार आहे. तसेच यापुढे उद्यान निरीक्षकांना वरील प्रकार आढळल्यास कारवाईचे अधिकार देण्यात आले. महापालिकेकडूनही दरवर्षी पावसाळ्यात हजारो झाडांची लागवड केली जाते. मात्र काही फुकटे या झाडांवर फलक- बॅनर लावणे, विद्युत रोषणाई करून स्वतःची जाहिरात हे प्रकार करत आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

अनेकजण झाडांना इजा पोचवतात. झाडांना त्रास होईल, असे कृत्य केले जात आहे. यामुळे झाडांची हानी होत असून याविरोधात उद्यान विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. ग्रो वेल्थ एजन्सीने शहरातील अनेक रस्त्यांवर एनए प्लॉट विकणे असल्याचे फलक झाडांना खिळे ठोकून जाहिरात केली आहे.

तसेच हॉटेल पीवर ग्रीन ऑल लिव्हज, रेड चिली, दि क्लिस्टो मल्टी कझिन व बॉबीज हॉटेल यांनी झाडांवर विद्युत रोषणाई करून स्वतःची जाहिरात केली आहे. तर कॉलेज रोड येथील क्रोमा शोरूमचेदेखील झाडांवर जाहिरात केली आहे. झाडांचा वापर करून स्वतःच्या व्यवसायाची जाहिरात केल्याप्रकरणी सातपूर उद्यान निरीक्षकांनी सबंधितांना नोटीस बजावत सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

Paaru : पारू-आदित्यचं लग्न होणार पण...नव्या प्रोमोने प्रेक्षक नाराज

Dindori Lok Sabha Constituency : गुरुजींसमोर ताईंना राजकीय खिचडी शिजवण्याचे आव्हान; दिंडोरी कांटे की टक्कर

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT