Nashik News : विवाह प्रोत्साहनपर अनुदानाचा 39 दिव्यांग जोडप्यांना लाभ! ZPकडूनही 8 दिव्यांगाना लाभ

Marriage
Marriageesakal

Nashik News : समाजकल्याण विभागांतर्गत अपंग कल्याण विभाग आणि जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागांतर्गत दिव्यांग-अव्यंगांच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य योजना राबविली जाते.

यात दिव्यांग जोडप्यास पन्नास हजार रूपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते. गत चार वर्षांत ३९ दिव्यांग जोडप्यांनी १९ लाख ५० हजार रूपयांच्या प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ घेतला आहे. (39 disabled couples benefit from marriage promotion subsidy 8 benefited from ZP Nashik News)

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ५० हजार रूपयांचे अनुदान देण्यात येईल. यात २५ हजार रूपयांचे बचत प्रमाणपत्र, वीस हजार रूपये रोख, तसेच चार हजार ५०० रूपयांची संसारोपयोगी साहित्य खरेदी व पाचशे रूपये स्वागत सभारंभ खर्चासाठी असतात.

त्यासाठी ४० टक्के दिव्यांगत्व असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. या योजेनंतर्गत २०१९ ते २०२३ या चार वर्षांत ३१ लाभार्थ्यांना १५ लाख ५० हजार रूपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. याच धर्तीवर जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नातून (सेस) समाजकल्याण अंतर्गत पाच टक्के निधी दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्याचा शासन निर्णय २५ जून २०१८ला झाला.

या राखीव निधीतून दिव्यांगांसाठी वैयक्तीक व सामुहिक योजना घेता येतात. सदर योजना घेण्याचे सर्वाधिक आधिकार संबंधित जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना आहेत. यानुसार जिल्हा परिषदेने दिव्यांगांना विवाहासाठी प्रोत्साहानपर योजना सुरू केली आहे. यात २०१९ ते २०२३ या चार वर्षात आठ लाभार्थ्यांना चार लाख रूपयांचे अनुदान वितरीत झालेले आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Marriage
Online Shopping : ऑनलाईन विकलं जातंय भूत शोधण्याचं मशीन; काय आहे प्रकरण?

अशी आहे आकडेवारी

वर्ष लाभार्थी निधी (रूपये)
२०१९-२० १३ सहा लाख पन्नास हजार
२०२०-२१ -- कोविडमुळे तरतूद नाही
२०२१-२२ १० पाच लाख
२०२२-२३ ०८ चाार लाख

जि. प. सेस अंतर्गत अनुदान

वर्ष लाभार्थी निधी (रूपये)
२०१९-२० ०१ पन्नास हजार
२०२०-२१ ०१ पन्नास हजार
२०२१-२२ ०१ पन्नास हजार
२०२२-२३ ०५ दोन लाख पन्नास हजार

Marriage
Success Story : वस्तीशाळेचा विद्यार्थी बनला कृषी अधिकारी! अंगूलगाव ग्राम पंचायततर्फे सत्कार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com