Equestrian statue of Chhatrapati Shivaji Maharaj
Equestrian statue of Chhatrapati Shivaji Maharaj esakal
नाशिक

Nashik Kalwan News: अडकलेला कोट्यवधींचा निधी अखेर कळवणला मिळाला

रवींद्र पगार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा असलेल्या शिवस्मारकाचे कळवणकरांनी अनेक वर्षांपासून पाहिलेले स्वप्न साकार झाले. कळवण बाजार समिती व `कमको’ बँकेत सत्ताधारी गटाला यश मिळाले. शेतकरी सहकारी संघाची निवडणूक बिनविरोध करण्यात वजनदार नेत्यांना यश मिळाले.

दुसरीकडे कळवण तालुक्यात वादळी वाऱ्यासह, गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पाचशे कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण आणि वर्षअखेरीस तालुक्यासाठी ३१६ कोटींचा मिळालेला निधी ही तालुक्याच्या पटलावरील काही महत्त्वाच्या नोंदी म्हणता येतील. - रवींद्र पगार,कळवण (Crores of stuck funds have finally been received kalwan nashik news)

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा असलेल्या शिवस्मारकाचे कळवणकरांनी गेल्या अनेक वर्षांपासून पाहिलेले स्वप्न १० मार्च २०२३ ला प्रत्यक्षात साकार झाले. कळवण तालुका छत्रपती स्मारक समितीतर्फे उभारण्यात आलेला उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक उंच असा हा पुतळा आहे..

महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर वर्षभर कळवण सुरगाणा तालुक्याच्या विकासाला निधीची कात्री लागली होती. जुले महिन्यातील घडामोडींनंतर मात्र मतदार संघातील विकासकामांना निधी मिळू लागला, त्यामुळे कामांना चालना मिळाली. कळवण व देवळा तालुका कार्यक्षेत्र असलेल्या कळवण येथील शेतकरी सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत अखेरच्या दिवशी उमेदवारांमध्ये समेट घडवून आणण्यात दोन्ही तालुक्यातील वजनदार नेत्यांना यश आल्यामुळे बिनविरोध निवड झाली.

श्री क्षेत्र सप्तश्रृंगीगड परिसराच्या विकास आराखड्याला मंजुरीचा शब्द नेत्यांनी खरा करत उच्चाधिकार समितीच्या बैठकीत ८१ कोटी ८६ लाख रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात येऊन निधी उपलब्ध झाला आहे.

कमको बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी गटाने सत्ता राखत विरोधकांचा धुव्वा उडवला. कळवण सुरगाणा तालुक्याच्या विकासासाठी चारशे कोटी रुपये मिळाल्याने मतदारसंघातील विकास कामांना चालना मिळाली. कळवण नगरपंचायतीने २२ कोटी रुपये खर्चून जॉगिंग ट्रॅक नागरिकांना उपलब्ध करून दिला.

अंतरवाली सराटी गावात पोलिसांनी मराठा समाजाच्या आंदोलकांवर लाठीमार केल्याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजातर्फे कळवणमध्ये आंदोलन करत मनोज जरागे पाटील यांना पाठिंबा देण्यात आला. कळवणच्या शिवतीर्थावर तसेच तालुक्यात ठिकठिकाणी लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

कांद्याचे निर्यात शुल्क वाढविल्याचा निषेध करीत झालेले आंदोलनांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाट करून दिली. कळवण तालुक्यात वीज बिलांची सक्तीची वसुली, रोहित्रवरील खंडीत वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी व तत्काळ रोहित्र उपलब्ध व्हावे यासाठी आंदोलने झाली.

अर्थ संकल्पीय अधिवेशनात कळवण सुरगाणा तालुक्यातील रस्ते विकासासाठी १४० कोटी ६५ लाखांचा निधी मिळाला. कळवण बसस्थानक नूतनीकरण व वाहनतळाचे काँक्रिटीकरणासाठी ७ कोटी ९५ लाख रुपये तर सप्तशृंगीगडावर पर्यटन विकासासाठी ३ कोटी २२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. तालुक्यातील पूल व रस्ते विकास कामासाठी १३५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल कधी अन् कुठं पाहणार, जाणून घ्या एका क्लिकवर

Share Market: लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी कसा असतो शेअर बाजार? तेजी येईल की घसरण होईल?

Hajipur Lok Sabha Result: वर्चस्वाच्या लढाईत वडिलांची जागा राखण्याचे चिराग यांच्यासमोर आव्हान

Pune Lok Sabha: पुण्यात भाजप-काँग्रेसकडून जल्लोषाची लगबग; पेढे, लाडू अन् गुलालाची फुल्ल ऑर्डर

Shripad Joshi: बारावीपर्यंत मराठी कम्पलसरी करायला टाळाटाळ का? साहित्यिक श्रीपाद जोशींचा सवाल

SCROLL FOR NEXT