tree cutting esakal
नाशिक

Nashik : परवानगी घेऊनच वृक्ष तोडा, अन्यथा कारवाई

विनोद बेदरकर

नाशिक : शहरातील अवैध वृक्षतोडीबाबत (Illegal Tree Cutting) महापालिकेने (NMC) पुन्हा एकदा इशारा दिला आहे. अवैधपणे वृक्षतोड आढळल्यास कमाल एक लाखांपर्यंत दंडासह फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. शहरात अवैध वृक्षतोडीबाबत महापालिका यंत्रणा गंभीर आहे. गुरुवारी (ता. १६) महापालिकेने यांसंदर्भात निवेदन देत महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ चे कलम ८ अन्वये नागरी क्षेत्रावरील (खासगी, शासकीय) वृक्ष तोडण्यावर प्रतिबंध घातला आहे. अवैध वृक्षतोड आढळल्यास कडक कारवाईचा पुन्हा इशारा दिला. (Cut down trees with permission otherwise action will taken by nmc Nashik News)

शहरात पावसाळी वृक्ष उन्मळून पडण्याचे प्रकार वाढले असून, त्यातून काही झाडामुळे नागरिकांचे बळी गेले आहे. त्याविषयी महापालिकेने जीवितास व वित्तास हानिकारक ठरणाऱ्या वृक्षाबाबत तसेच विकासकामात अडसर ठरणाऱ्या वृक्षाबाबत अधिनियमातील तरतुदीनुसार तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार वृक्ष तोडीच्या प्रस्तावांवर निर्णय होऊन आवश्यकतेप्रमाणे वृक्ष तोडण्यासाठी भरपाई वृक्ष लागवड करण्याच्या अटीवर वृक्ष तोडण्यास मंजुरी दिली जाईल, असेही स्पष्ट केले आहे.

अवैध वृक्षतोड सुरूच

नाशिक रोड जाचकनगर भागात दोन पावसाळी वृक्षांचा विस्तार विनापरवानगी कमी केल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार संबंधितास १ लाख ४० हजाराचा दंड केला. तर, एका ठिकाणी वृक्ष वाळविण्याच्या दृष्टीने संबंधिताने वृक्षाच्या खोडाभोवती काप दिले. त्याअनुषंगाने संबंधित सोसायटी अध्यक्षाला १ लाख रुपये दंड केला आहे. संबंधितांनी दंड न भरल्यास सदर दंडाच्या रक्कमेचा त्यांच्या घरपट्टीवर बोजा चढविण्याला महापालिका आयुक्तांनी (NMC Commissioner) मान्यता दिली आहे. यापूर्वी नाशिक रोडला जुना ओढा रोड येथे ७ वृक्षांच्या अवैध कत्तलीबद्दल ४ लाख २० हजाराचा दंड केला. दोन दिवसांपूर्वी बुधवारी (ता. १५) दंडाची रक्कम महापालिकेत जमा झाली आहे.

"शहरात नागरिक व विकासक हे वृक्षतोडीसाठी परवानगी न घेता परस्पर वृक्षतोड किंवा वृक्षांचा विस्तार कमी करतात. विनापरवानगी व अवैधरीत्या वृक्ष तोडल्यास प्रति वृक्ष जास्तीत- जास्त १ लाखापर्यंत दंड होऊ शकतो. तसेच, १ आठवड्यापासून १ वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे धोकादायक व बांधकाम ठिकाणी वृक्षांची तोड करण्यासाठी किंवा छाटणी करण्यासाठी रीतसर परवानगी घ्यावी. अन्यथा कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल."

- विजयकुमार मुंडे, उपायुक्त, उद्यान, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT