Dada Bhuse & Eknath Shinde
Dada Bhuse & Eknath Shinde esakal
नाशिक

जिथे तुम्ही, तिथे आम्ही : दादा भुसे अखेर एकनाथ शिंदे गटात सामील

प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) प्रमुख पक्ष शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या गटाची संख्या हळूहळू वाढत असतानाच मुंबईत ठाण मांडून बसलेले कृषीमंत्री दादा भुसे (Dada bhuse) तीन दिवसाच्या प्रतिक्षेनंतर अखेर शिंदे यांच्या गोटात सामील झाले. यानंतर जिल्ह्यातील शिवसेना (Shivsena) कार्यकर्त्यांची उत्सुकता संपुष्टात आली. मालेगाव व परिसरातील बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून जिथे तुम्ही, तिथे आम्ही या आशयाचे स्टेटस ठेवून मेसेज देत भुसे यांच्या पाठीशी राहण्याचा निश्‍चय व्यक्त केला आहे. (Dada Bhuse finally joined Eknath Shinde group Maharashtra Politics News)

धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराने प्रेरीत होवून शिवसेनेच्या मुशीत वाढलेल्या श्री. भुसे यांची द्विधा मनस्थिती होती. शिवसेनेने सामान्य कार्यकर्ते असताना सर्वकाही दिले. याउलट श्री. शिंदे यांच्याशी असलेले मैत्रिपूर्ण संबंध गेल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात त्यांच्याकडून झालेली मोलाची मदत, विकासकामांसाठी या पाश्‍र्वभूमीवर काय निर्णय घ्यावा याबाबत त्यांच्या मनात संभ्रम होता. शहरातील मावळते उपमहापौर निलेश आहेर, तालुकाप्रमुख मनोहर बच्छाव, माजी तालुकाप्रमुख संजय दुसाने, सुनील देवरे, रामा मिस्तरी, आदींसह नऊ ते दहा निवडक पदाधिकारी बुधवारी मुंबई येथे गेले. त्यांनी श्री. भुसे यांना आपण जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल. तुमच्या सद्‌सद विवेक बुध्दीला स्मरुण निर्णय घ्या. आम्ही तुमच्या पाठीशी राहू असा दिलासा देत आज माघारी फिरले.

श्री. भुसे बुधवारी रात्री उशिरापर्यंत सर्वांच्या संपर्कात होते. मंत्रीमंडळाच्या अखेरच्या बैठकीतही सुभाष देसाई, उदय सामंत यांच्यासह त्यांची उपस्थिती होती. गुरुवारी सकाळपासूनच मात्र ते नॉट रिचेबल होते. माजी मंत्री संजय राठोड, रवींद्र फाटक यांच्यासह ते शिंदे यांच्या गोटात दाखल होण्यासाठी गुवाहटीला रवाना झाल्याचे खात्रीलायकरित्या समजले. श्री. भुसे यांच्या शिंदे गोटात सामील होण्याच्या निर्णयामुळे येथील शिवसेनेचा बुरुज ढासळला आहे. पक्षनिष्ठा की मित्रप्रेम यात मित्रप्रेमाला प्राधान्य देत काळाची पावले ओळखून श्री. भुसे यांनी शिंदे यांच्या समवेत जाण्याचा निर्णय घेतला.

भुसे थांबले की थांबविले गेले

एकनाथ शिंदे व भुसे यांच्यातील मैत्रीपुर्ण संबंध राज्याला सर्वश्रूत आहेत. यातच ठाणे येथील खासदार राजन विचारे हे भुसे यांचे व्याही, श्री. शिंदे यांचे तरुणपणाचे मित्र आहेत. या दोघांची दृढ मैत्री धर्मवीर चित्रपटातून सर्वांसमोर आली. त्यातच श्री. विचारे हे भुसे यांचे व्याही व आप्तेष्ट असल्याने शिंदे यांच्या समवेत भुसे पहिल्या फळीत असतील असा अंदाज होता. मात्र तीन दिवस ते सातत्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या प्रत्येक बैठकीत सहभागी झाले. आदित्य ठाकरे सारथ्य करीत असलेल्या गाडीतून हॉटेलकडे जातांनाही ते दिसले. यानंतर श्री. भुसे, श्री. राठोड यांनी मुख्यमंञ्यांना श्री. शिंदे यांचा प्रस्ताव दिल्याची चर्चा होती. त्या पाश्‍र्वभूमीवर श्री. भुसे जाणूनबुजून मुंबईत थांबले की त्यांना थांबविले गेले या विषयी मोठी उत्सुकता व चर्चा होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal News : जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांना मोठा दिलासा! अखेर हायकोर्टाकडून जामीन मंजूर

Rohit Sharma IPL 2024 : सुट्टी नाही! मेगा लिलावासाठी रोहितला खेळावेच लागणार... माजी विकेटकिपरने कोणते संकेत दिले?

Alyad Palyad: ‘अल्याड पल्याड’ चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार सिद्धयोगी साधूची भूमिका; लूकनं वेधलं लक्ष

ICICI Bank: NRI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; UPI संदर्भात नवीन घोषणा, जाणून घ्या प्रक्रिया

Latest Marathi News Update: जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना दोन महिन्यांसाठी अंतरिम वैद्यकीय जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT