Guardian Minister Dada Bhuse during the inspection of Girls Pre-Recruitment Training Center
Guardian Minister Dada Bhuse during the inspection of Girls Pre-Recruitment Training Center  esakal
नाशिक

Dada Bhuse : मुलींच्या सैनिक भरतीपूर्व केंद्रास सुविधा पुरविणार; संस्थेस पालकमंत्री भुसेंची भेट

सकाळ वृत्तसेवा

Dada Bhuse : देशात पहिले मुलींचे सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण संस्था केंद्र नाशिक येथे असल्याने देशाचे लक्ष नाशिककडे लागलेले आहे.

या संस्थेतून पहिली मुलींची बॅच प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणार आहे. (dada bhuse statement about military Pre Recruitment Center for Girls nashik news)

त्यामुळे येथील मुलींना प्रशिक्षणदरम्यान सर्व सुविधा पुरविण्यास शासन कटिबद्ध असल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. या मुलींना पोलिस परेड मैदान सरावासाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. भुसे यांनी शुक्रवारी (ता. ३०) त्र्यंबक रस्त्यावरील मुलींच्या सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण संस्थेस भेट देत पाहणी केली. श्री. भुसे यांनी प्रशिक्षण केंद्रप्रमुखांकडून माहिती घेतली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यानंतर विद्यार्थिनींशी संवाद साधला. विद्यार्थिनींनी सरावासाठी पोलिस परेड मैदान, तसेच सरावासाठी आवश्यक असणारे ड्रेस मिळावे, अशी मागणी केली.

या केंद्रात आपणास आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही श्री. भुसे यांनी दिली. त्यानंतर भुसे यांनी येथील कर्मचारी व अधिकारी यांच्याशी चर्चा केली. यात केंद्रातील प्रशिक्षणार्थी असलेल्या विद्यार्थिनींना कोणताही त्रास होता कामा नये. कोणतीही तक्रार येणार नाही याची दक्षता घ्या, अशा सूचना श्री. भुसे यांनी करत, तक्रारी आल्यास दोषींची गय केली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे खरंच वीस दिवसांमध्ये NDA मध्ये येतील का? आमदाराचा नेमका दावा काय?

Ind vs Ire T20 WC24 : 5 जूनला भारत-आयर्लंड सामना पावसामुळे रद्द तर… कोणाला होणार फायदा?

Share Market Today: आज शेअर बाजारात काय होणार? इंट्राडेमध्ये कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक कराल?

World Bicycle day 2024: या देशाचे पंतप्रधान मर्सिडीज-BMW तून नाही, तर सायकलने जातात संसदेत, संपूर्ण देश आहे सायकलप्रेमी

Latest Marathi News Live Update: विरार ते दहिसर मार्गावर प्रचंड गर्दी

SCROLL FOR NEXT