Dada Bhuse: नाशिक रोड नाट्यगृहासह मुंढेगाव चित्रपटसृष्टीसाठी प्रयत्न : दादा भुसे

actor Prashant Damle, Guardian Minister Dada Bhuse, Natya Parishad Nashik Branch President Prof. Ravindra Kadam, Vice President Dr. Aniruddha Dharmadhikari, Sunil Dhage etc
actor Prashant Damle, Guardian Minister Dada Bhuse, Natya Parishad Nashik Branch President Prof. Ravindra Kadam, Vice President Dr. Aniruddha Dharmadhikari, Sunil Dhage etcesakal

Dada Bhuse : नाशिक रोड येथील नाट्यगृहास ३५ कोटी रुपये मंजूर असताना त्याचे काम थांबलेले आहे. तसेच मुंढेगाव येथे चित्रपटसृष्टी उभारण्याचा प्रस्ताव मंत्रालय स्तरावर पडून आहे. या दोन्ही विषयांची माहिती घेऊन हे दोन्ही विषय सोडवू, असे आश्वासन पालकमंत्री दादा भुसे यांनी येथे दिले. (Dada Bhuse statement Efforts for Mundhegaon Film Industry with Nashik Road Theater nashik news)

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती, मुंबई येथे निवड झाल्याबद्दल अभिनेते प्रशांत दामले यांचा सत्कार बुधवारी (ता.२१) त्यांच्या हस्ते करण्यात आला. महाकवी कालिदास कलामंदिरात हा सोहळा पार पडला. या वेळी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे, उपाध्यक्ष अॅड. अनिरुद्ध धर्माधिकारी, राजेंद्र जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते उपस्थित होते.

पालकमंत्री भुसे यांनी नाट्य परिषद व चित्रपट महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. नाशिक रोडला २० वर्षांपासून नाट्यगृहाची मागणी आहे. ७२० खुर्च्यांचे नाट्यगृह मंजूर आहे. माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या प्रयत्नातून ३५ कोटी रुपये मंजूर आहेत.

मात्र पुढील काम का थांबले आहे, याविषयी माहिती नसल्याचे नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावर पालकमंत्री भुसे यांनी याविषयी माहिती घेऊन तत्काळ हा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

actor Prashant Damle, Guardian Minister Dada Bhuse, Natya Parishad Nashik Branch President Prof. Ravindra Kadam, Vice President Dr. Aniruddha Dharmadhikari, Sunil Dhage etc
Anganwadi Recruitment: अंगणवाडी सेविका व मदतनिस पदांची भरती! पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

मुंढेगावच्या चित्रपटसृष्टीबाबतही महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. याविषयी वरिष्ठांशी चर्चा करून मुंढेगावचा विषय सोडवण्यात येईल, असेही भुसे म्हणाले. याप्रसंगी खजिनदार ईश्वर जगताप, सहकार्यवाह विजय शिंगणे, राजेश भुसारे यांसह नाट्य, साहित्य व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेतर्फे झालेला सन्मान मी कदापी विसरणार नाही. यापुढे अधिक काम करण्याचा प्रयत्न करेल. एवढेच यानिमित्ताने सांगू शकतो, अशा भावना प्रशांत दामले यांनी या वेळी व्यक्त केल्या.

actor Prashant Damle, Guardian Minister Dada Bhuse, Natya Parishad Nashik Branch President Prof. Ravindra Kadam, Vice President Dr. Aniruddha Dharmadhikari, Sunil Dhage etc
English School Admission : इंग्रजी शाळेत प्रवेशासाठी 30 जून पर्यंत मुदत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com