Dasara 2023
Dasara 2023 esakal
नाशिक

Dasara 2023: भाविकांनी लुटले सीमोल्लंघनाचे सोने! विजयादशमीला कालिका दर्शनासाठी प्रचंड गर्दी

सकाळ वृत्तसेवा

Dasara 2023 : दसऱ्याच्या मंगलमय पर्वात सीमोल्लंघनाचे सोने लुटत भाविकांनी ग्रामदैवत श्री कालिकेच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. सकाळच्या तुलनेत सायंकाळी गर्दीचा महापूर लोटला होता. दरम्यान, देवस्थानच्या विश्‍वस्तांतर्फे दुपारी पारंपारिक शस्त्रपूजन मोठ्या उत्साहात पार पडले. (Dasara 2023 Devotees Huge crowd for Kalika Darshan on Vijayadashami nashik)

गत नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या श्री कालिकामाता यात्रा उत्सवात मंगळवारी (ता. ) सायंकाळनंतर भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.

दसऱ्याचे सोने लुटत अनेकांनी देवीच्या चरणी सुख- समाधानासाठी साकडे घातले. विशेष म्हणजे आजही पुरूषांच्या तुलनेत महिला भाविकांची संख्या मोठी होती. दुपारी बारा वाजता संस्थानचे अध्यक्ष केशव पाटील व अन्य विश्‍वस्तांच्या उपस्थितीत शस्त्रपूजन उत्साहात पार पडले.

यात्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या विविध खेळणी व स्टॉल्सला भाविकांनी मोठा प्रतिसाद दिल्याने यात्रोत्सवातून लाखो रुपयांची उलाढाल झाली.

यात्रोत्सव कोजागरीपर्यंत सुरू राहणार असलातरी बहुसंख्य खेळणी विक्रेते उद्याच नाशिकचा निरोप घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, दसऱ्याचे औचित्य साधत मंगळवारी दुपारी मंदिरात शस्त्रपूजन उत्साहात पार पडले.

श्री कालिकादेवी ट्रस्ट, अखिल भारतीय मराठा महासंघ, तलवारबाजी असोसिएशन व शिवसह्याद्री प्रतिष्ठानतर्फे हे पूजन आयोजित करण्यात आले होते.

या वेळी क्रीडा व युवक सेवेचे उपसंचालक रवींद्र नाईक, संस्थानचे अध्यक्ष पाटील, मराठा महासंघाचे चंद्रकांत बनकर आदींच्या उपस्थितीत मंत्रोच्चाराच्या गजरात हे शस्त्रपूजन पार पडले.

रुग्ण तपासणी शिबिरास प्रतिसाद

नवरात्रोत्सवाच्या दहा दिवसांच्या काळात कालिकेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एसआरव्ही राजेबहाद्दर हॉस्पिटल, नशामुक्ती केंद्र, देवरे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयातर्फे विनामूल्य प्राथमिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिराचा गत दहा दिवसांत हजारो रुग्णांनी लाभ घेतल्याचे पथकातील वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. डॉ. सुभाष देवरे, डॉ. निवेता जॉर्ज आदींच्या नेतृत्वाखाली रक्तदाब, शुगर तपासणी केली.

यात ऋषिकेश कदम, श्‍वेता देशमुख, कावेरी घुगे, रेणू देसाई, दीपक हिरे आदींनी सहभाग घेतला. तसेच, श्री कालिकादेवी ट्रस्ट, अखिल भारतीय मराठा महासंघ, शिवसह्याद्री प्रतिष्ठानतर्फे आयोजित रक्तदान शिबिरास भाविकांनी मोठा प्रतिसाद दिला.

मंगळवारी सायंकाळपर्यंत साडेतीनशेहून अधिक बाटल्या रक्तसंकलन झाले. अर्पण रक्तपेढीतर्फे आयोजित रक्तदान शिबिर कोजागरीपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती मराठा सेवा संघाचे अविनाश वाळुंज यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR Live Score: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT