local sakal
नाशिक

Nashik Kalyan Local News: इन्स्पेक्शनवरच कल्याण लोकलचे भवितव्य

सकाळ वृत्तसेवा

Nashik Kalyan Local News: नाशिककरांना मुंबईची कनेक्टिव्हिटी वाढविणारी नाशिक कल्याण मेमू (मेन लाइन इलेक्ट्रिकल मल्टिपर्पज युनिट) लोकल सुरू होणार की नाही, याचा निर्णय लखनौच्या रिसर्च डिझाइन ॲन्ड स्टॅंडर्ड ऑर्गनायझेशनने इन्स्पेक्शन केल्यावरच होणार आहे. (Decision whether to start Kalyan local or not on inspection nashik news)

ही लोकल सुरू करण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याचे या प्रकल्पाची संकल्पना मांडणारे रेल्वे इंजिन तज्ज्ञ वामन सांगळे यांनी म्हटले आहे. गेल्या पाच वर्षांपासून नाशिक-कल्याण लोकलचा गाजावाजा सुरू आहे.

श्री. सांगळे यांच्या संकल्पनेतून खासदार हेमंत गोडसे यांनी लोकसभेत या प्रकल्पाची मागणी केली होती.त्यानंतर ३५ कोटी रुपयांची लोकल बनवून कुर्लाकार शेडला आली.

या लोकलच्या चाचणीसाठी ‘आरडीएसओ’ने अजूनही सकारात्मकता दर्शविलेली नाही. नाशिक-कल्याण लोकलच्या टेस्टिंगसाठी नऊ लाख रुपये मंजूर झाले होते.

मात्र, ही टेस्टिंगही झालेली नाही. दरम्यान, शासन प्रकल्पासंदर्भात उदासीन आहे. नाशिकची कनेक्टिव्हिटी वाढवायची असेल तर हा प्रकल्प शासनाने कार्यान्वित करायला हवा, असे श्री. सांगळे यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Action against Anil Ambani : अनिल अंबानींवर ‘ED’ची मोठी कारवाई!, मुंबईतील अलीशान घर तात्पुरते जप्त

PCMC News : ‘स्थायी’च्या अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणेंना संधी; एकमेव अर्ज दाखल; बिनविरोध निवड निश्चित, शनिवारी होणार शिक्कामोर्तब

Lung cancer in Mumbai : मुंबईत फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या ५७ टक्के रुग्णांमध्ये प्रदूषण हेच प्रमुख कारण!

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

SCROLL FOR NEXT