savarkar esakal
नाशिक

सावरकर, कुसुमाग्रजांना संमेलनाची निमंत्रण पत्रिका समर्पित

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीने आज स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर स्मारकात जाऊन त्या ठिकाणी साहित्य संमेलनाची निमंत्रण पत्रिका समर्पित केली.

त्यानंतर ख्यातनाम साहित्यिक वि. वा. शिरवाडकर तथा कवी कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानी जाऊन निमंत्रण पत्रिका समर्पित करण्यात आली.
लोककवी वामनदादा कर्डक यांचे निवासस्थानी त्यांच्या वंशजांना संमेलनाचे निमंत्रण देण्यात आले.
दलित साहित्याचे क्रांती विज्ञान मांडणारे तत्वज्ञ लेखक बाबुराव बागुल यांच्या निवासस्थानी जाऊन साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीने संमेलनाची निमंत्रण पत्रिका समर्पित करून त्यांच्या वंशजांना निमंत्रण दिले.

यावेळी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी रमेश पवार, विशाल बलकवडे, प्रशांत कापसे, मनोज कुवर, मंगेश मरकड, लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त व संमेलनाचे कार्याध्यक्ष, प्रसिद्ध लेखक हेमंत टकले, स्वागत मंडळाचे उपाध्यक्ष प्राचार्य प्रशांत पाटील, निमंत्रक प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर, कार्यवाह शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर हे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ethanol Blended Petrol : 'इथेनॉलशिवाय कारखानदारी टिकणे अवघड'; मुख्यमंत्री फडणवीसांनी पेट्रोलमुळे वाहनांचं नुकसान कसं होतं तेही सांगितलं!

शूटिंगच्या पहिल्या दिवशी मृणाल दुसानिस खूप रडलेली, 'माझिया प्रियाला...' मालिकेबद्दल बोलताना म्हणाली; “ आईकडे पाहत मी रडत होते”

RTOने दंडात्मक कारवाईनंतर कागदपत्रे बराच वेळ दिली नाही, चालकानं समृद्धीवर ट्रकच आडवा लावला; वाहतूक तासभर ठप्प, VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : गृहमंत्री अमित शहा संसदेत निवेदन देणार? 'या' 2 मोठ्या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक, अधिवेशनाचा शेवटचा आठवडा ठरणार वादळी!

Yavatmal Loan Waiver Issue: कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

SCROLL FOR NEXT